नॅशनल हेराल्डशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान तीन दिवस सलग चौकशी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ईडीकडे २० जूनपर्यंत चौकशी पुढे ढकलण्याची विनंती केली. ईडीने राहुल गांधी यांची विनंती मान्य केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधी यांनी ईडी अधिकाऱ्यांना आपल्याला गंगाराम रुग्णालयात आईची काळजी घेण्यासाठी थांबायचं असल्याचं सांगितलं. सोनिया गांधींना करोनाची लागण झाली असून सध्या त्या दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात उपचार घेत आहेत. ईडीने सोनिया गांधींनाही चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. पण कोविड पॉझिटिव्ह असल्याने त्या चौकशीला उपस्थित राहू शकल्या नाहीत.

National Hearld: ‘यंग इंडियन’कडून किती पैसे घेतले? ईडीच्या प्रश्नावर राहुल गांधींनी दिलं उत्तर; म्हणाले…

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी पूर्ण दिवस रुग्णालयात असणार आहेत. याआधी ईडी अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना १७ जूनला चौकशीच्या चौथ्या टप्प्यासाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. पण आता सोमवारपर्यंत ही चौकशी पुढे ढकलण्यात आली आहे.

‘नॅशनल हेराल्ड’ची मूळ कंपनी ‘असोसिएट जर्नल’ आणि ‘यंग इंडियन’ कंपनीतील आर्थिक व्यवहारासंदर्भात ईडीकडून राहुल गांधींची चौकशी सुरु आहे. हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) द्वारे प्रकाशित केले जाते आणि यंग इंडियनच्या मालकीचे आहे.

विश्लेषण: ईडी म्हणजे नेमकं काय? स्थापना कधी झाली? ईडीच्या प्रकरणांमध्ये सहज जामीन का मिळत नाही?

विश्लेषण: २००० कोटींची संपत्ती ५० लाखांमध्ये… ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरण नेमकं आहे तरी काय? सोनिया गांधी, राहुल गांधींशी संबंध कसा?

‘असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ कंपनीला कर्जमुक्त करण्यासाठी ‘यंग इंडियन’ कंपनी स्थापन करून ९० कोटी देण्यात आले. हे ९० कोटी काँग्रेसने ‘यंग इंडियन’ला दिले होते. यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार २०१३ मध्ये भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती. या प्रकरणात राहुल व सोनिया गांधी यांना जामीन मिळाला आहे.

यंग इंडिया कंपनीबद्दल

यंग इंडिया लिमिटेड या कंपनीची स्थापना नोव्हेंबर २०१० साली झाली होती. या कंपनीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा सर्वात मोठा म्हणजे ७६ टक्के वाटा होता. तर २४ टक्के वाटा हा मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नाडिस यांचा समान म्हणजेच प्रत्येकी १२ टक्के वाटा होता. या कंपनीची नोंदणी नवी दिल्लीमधील आयटीओमधील हेराल्ड हाऊसच्या पत्त्यावरच करण्यात आलेली.

मुख्य घटनाक्रम

– नोव्हेंबर २०१२ मध्ये सुब्रह्मण्यम स्वामी यांनी जमीन ताब्यात घेतल्याप्रकरणी गांधींविरोधात गुन्हेगारी स्वरुपाची तक्रार दाखल केली.
– जून २०१४ मध्ये महानगर दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये प्राथमिक पुराव्यांच्या आधारे सर्व आरोपींना सन्मस बजावले
– ऑगस्ट २०१४ मध्ये ईडीने या प्रकरणामध्ये मनी लाँडरिंग झालं आहे की नाही यासंदर्भात तपास सुरु केला.
– सप्टेंबर २०१५ मध्ये ईडीने या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरु केला
– डिसेंबर २०१५ मध्ये पतियाला कोर्टाने सोनिया आणि राहुल गांधींना जामीन मंजूर केला
– फेब्रुवारी २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये आरोपींविरोधतील कारवाई रद्द करण्याची याचिका फेटाळली
– मे २०१९ मध्ये ईडीने या प्रकरणामध्ये १६ कोटी ३८ लाखांची संपत्ती प्रकरणामध्ये ताब्यात घेतली.
– जून २०२२ मध्ये ईडीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी सोनिया गांधी, राहुल गांधींना सन्मन बजावले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National herald ed accepts rahul gandhi request postpones questioning to june 20 sgy
First published on: 17-06-2022 at 08:48 IST