काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू १० महिन्यानंतर तुरुंगाबाहेर आले आहेत. १९८८ च्या रस्त्यावर झालेल्या वाद आणि हाणामारीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नवज्योत सिंग सिद्धू यांना १९ मे २०२२ रोजी एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. पण, तुरुंगातील चांगल्या वर्तवणुकीमुळे दोन महिन्याआधीच सिद्धू यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिद्धूंच्या स्वागताला मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते तुरुंगाबाहेर आले होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुरुंगातून बाहेर येताच सिद्धू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. “पंजाबात राष्ट्रपती राजवट लावण्याचं षड्यंत्र रचलं जात असून, अल्पसंख्याकांना लक्ष्य करणअयात येत आहे. पंजाबला कमकुवत करण्याचं काम केलं जात आहे. देशात लोकशाही राहिली नसून, हुकूमशाही आली आहे. पण, देशात एक क्रांती आली आहे. त्याचं नाव राहुल गांधी आहे. पंजाब ही देशाची ढाल आहे. आज ती ढाल तोडण्याचं प्रयत्न सुरू आहेत,” असा आरोपही नवज्योत सिंग सिद्धू यांनी केला आहे.

हेही वाचा : बुद्ध पौर्णिमेला सरकारी सुट्टी मागणाऱ्या याचिकाकर्त्याला मद्रास उच्च न्यायालयाने सुनावले; म्हणाले, “भगवान बुद्धांनाही…”

काय आहे प्रकरण?

पतियाळा येथे १९८८ मध्ये नवज्योत सिद्धू यांचं पार्किंगवरून भांडण झाले होते. ज्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पाच वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती.

हेही वाचा : “सुशिक्षित व्यक्ती गटारीतून निघणाऱ्या गॅसवर…”, पदवीवरून केजरीवालांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

मात्र, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी केलेल्या फेरविचार याचिकेवर एक वर्षाच्या शिक्षेचा निकाल सुनावताना सर्वोच्च न्यायालयाच्या अजय खानविलकर आणि एस. के. कौल यांच्या खंडपीठाने नमूद केले, की मागील शिक्षा सुनावताना काही भौतिक तथ्ये लक्षात घ्यायला हवी होती. पण, त्यावेळी शिक्षा देताना ही तथ्ये लक्षात घेतली गेल्याचे दिसत नाही. त्यापैकी एक तथ्य म्हणजे या घटनेच्या वेळी २५ वर्षीय क्रिकेटपटू सिद्धूंची शारीरिक क्षमता लक्षात घेतली गेली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navjot singh sidhu soon after his release from patiala jail say rahul gandhi revolution country ssa