scorecardresearch

नवज्योतसिंग सिद्धू

नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu)_हे माजी क्रिकेटपटू (Cricketer) आहेत. सध्या ते राजकाणात सक्रिय असून त्यांनी पंजाबचे पर्यटन आणि सांस्कृतिक व्यवहारमंत्री म्हणून काम केलेले आहे.

सिद्धू २००४ च्या लोकसभा निवडणुकीत अमृतसर (Amritsar) या मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र त्यांच्यावर हत्येचा आरोप करण्यात आल्यानंतर त्यांनी २००६ साली आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. एप्रिल २०१६ साली भाजपाने त्यांना राज्यसभेत पाठवले. मात्र लगेच १८ जुलै २०१६ रोजी त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पुढे सप्टेंबर २०१६ साली त्यांनी भाजपा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.

जानेवारी २०१७ साली ते काँग्रेसमध्ये (Congress) सामील झाले. ते २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत अमृतसर (Amritsar) मतदारसंघातून निवडून आले होते. पुढे २०२१ साली त्यांची पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. मात्र २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
Read More

नवज्योतसिंग सिद्धू News

navjyot singh siddhu
नवज्योत सिंग सिद्धू तुरुंगातून बाहेर येत पंजाबच्या राजकारणात सक्रीय होण्याच्या तयारीत, पण…

मार्च महिन्यापासून नवज्योत सिंग सिद्धू तुरुंगात आहेत.

Navjyot Singh Sidhu
“नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात ध्यानधारणा…”, तुरुंग अधिकाऱ्यांचा ‘पॉझिटिव्ह फीडबॅक’, जानेवारीतच होणार सुटका?

सिद्धू यांची चार महिने आधीच कशी होणार सुटका, तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितलं सुटकेचं गणित!

“सिद्धूने पैशांसाठी आईला घराबाहेर काढलं, रेल्वे स्थानकावर सोडला जीव,” बहिणीचे गंभीर आरोप

१९८९ मध्ये रेल्वे स्थानकावर आईचा मृत्यू झाला; सुमन तूर यांची माहिती

Navjot-Singh-Sidhu
नवज्योतसिंग सिद्धूंनी कायमचं मौन पाळलं तर काँग्रेसला शांतता मिळेल! भाजपाच्या मंत्र्यांचा खोचक टोला

“काँग्रेस हे एक जहाज आहे जे बुडणार आहे”, अशी देखील टीका या भाजपा मंत्र्यांकडून करण्यात आली आहे.

Navjot Sidhu Warns UP Congress Priyanka Gandhi Arrest Lakhimpur gst 97
“जर उद्यापर्यंत प्रियंका गांधींची सुटका केली नाहीत तर…”; नवज्योतसिंग सिद्धूंचा उत्तर प्रदेशला इशारा

प्रियांका गांधींच्या टीकेनंतर नवज्योतसिंग सिद्धूंनी ट्विट करत उत्तर प्रदेश सरकारला इशारा दिला आहे.

ताज्या बातम्या