फरिदाबादमध्ये सवर्णानी घराला लावलेल्या आगीत दोन लहान मुलांचा भाजून मृत्यू झाल्याप्रकरणी बिहारमधील महाआघाडीचे नेते नितीशकुमार आणि लालूप्रसाद यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर हल्ला चढविला आहे.गोळवलकर गुरुजींच्या पुस्तकांमध्ये दलितविरोधी संकल्पना असल्याने ती जाळून टाकावी, अशी मागणी आपण केली होती, मात्र त्यांच्या राजवटीत दलितांनाच जिवंत जाळण्यात येत आहे, असे लालूप्रसाद यांनी ट्विट केले आहे. नितीशकुमार यांनीही या घटनेबाबत केंद्र सरकारवर टीका केली आहे. हमारी सरकार बना दो, सब ठीक हो जाएगा, असे म्हणणारे आता कोठे आहेत, असा सवाल नितीशकुमार यांनी केला आहे.
हरयाणातील वल्लभगड येथे सवर्णानी दलितांच्या घराला लावलेल्या आगीत दोन लहान मुले भाजून मरण पावली होती. बुधवारी त्यांच्या कुटुंबीयांचे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट घेऊन सांत्वन केले.