वृत्तसंस्था, गुवाहाटी
आसाममधील पूरस्थिती बुधवारीही गंभीर राहिली. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएम) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २१ जिल्ह्यांतील ६.३ लाख नागरिक पुरामुळे बेघर झाले आहेत. प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, पुरात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
संततधार पाऊस आणि ब्रह्मपुत्र नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे आसाममधील मोरीगाव आणि दरंग जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसल्याचे सांगण्यात आले. श्रीभूमी जिल्ह्यातील २.३१ लाख लोक बेघर झाले आहेत.
अरुणाचल प्रदेशात सततच्या पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये एकूण १२ जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे २३ जिल्ह्यांमधील ३,००० हून अधिक नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे.