Parliament Session 2025 Operation Sindoor Debate Hightlights: ऑपरेशन सिंदूरवरील चर्चा आजही संसदेत सुरू राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दुपारी लोकसभेत ‘ऑपरेशन महादेव’बद्दल माहिती दिली. पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना ऑपरेशन महादेव अंतर्गत भारतीय लष्कराने ठार केल्याचे अमित शाह यांनी सांगितले. तसेच अमित शाह यांनी विरोधकांनी काल केलेल्या टीकेला उत्तर दिले. सोमवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेला सुरुवात केली. मंगळवारी रात्री १ वाजेपर्यंत सहभागृह चालले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला उत्तर देत आहेत.

संसदेत होणाऱ्या चर्चेचे लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या…

Live Updates

Parliament Monsoon Session 2025 Hightlights | संसदेचे पावसाळी अधिवेशन २०२५ लाईव्ह अपडेट्स

13:12 (IST) 29 Jul 2025
Amit Shah Parliament Speech LIVE News Updates: काँग्रेसने पाकिस्तानला क्लीन चीट दिली – अमित शाह

“काल काँग्रेसने प्रश्न विचारला की, दहशतवादी कुठून आले, त्याला कोण जबाबदार होते? नक्कीच ती जबाबदारी आमची आहे. पण माजी गृहमंत्री पी. चिदंबरम काल म्हणाले की, दहशतवादी पाकिस्तानातूनच आले होते, याचा पुरावा काय? मी त्यांना प्रश्न विचारतो की, तुम्ही पाकिस्तानला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात का? चिदंबरम हा प्रश्न विचारत आहेत, कारण ते पाकिस्तानला क्लीन चीट देत आहेत”, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.

13:00 (IST) 29 Jul 2025
Amit Shah Parliament Speech LIVE News Updates: माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यामुळेच पीओके भारताला मिळाला नाही, अमित शाह यांची टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देत असताना माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका केली. १९४८ साली नेहरुंनी एकतर्फी युद्धबंदी केल्यामुळे पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानला मिळाला. त्याचवेळी नेहरुंनी प्रयत्न केले असते तर पीओके भारतात असता, असे विधान अमित शाह यांनी केले.

12:48 (IST) 29 Jul 2025
Parliament Monsoon Session 2025 Live Updates: ऑपरेशन महादेवमध्ये मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांची नावे गृहमंत्री अमित शाहांनी केली जाहीर

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून लष्कराने ठार केले केले आहे. या तीन दहशतवाद्यांची नावे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत जाहीर केली आहेत. सुलेमान, अफगान आणि जिब्रान असे या तीन दहशतवाद्यांची नावे आहेत. हे तीनही दहशतवादी पाकिस्तानमधून आले होते, असेही अमित शाह यांनी सांगितले.

असदुद्दीन ओवैसींची 'अंकल सॅम'वर टीका! (फोटो – Loksabha Live Screengrab)