गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचे रणकंदन सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. उद्या ( ५ डिसेंबर ) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईची भेट घेतली आहे. दुपारी गांधीनगर येथील निवासस्थानी पंतप्रधान मोदी यांनी हिराबेन मोदी यांची भेट घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात विधासनभेसाठी अहमदाबाद येथे मतदान करणार आहे. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी आई हिराबेन मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी आईबरोबर चहा पीत गप्पाही मारल्या. त्यानंतर आईचे आशीर्वाद घेत पंतप्रधान आपल्या पुढील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

Photos: आजचा दिवस पंतप्रधान मोदींसाठी फारच खास… आईच्या पायाशी जाऊन बसले; फोटो शेअर करत म्हणाले, “आज मी…”

जून महिन्यात पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केलं होतं. तेव्हा पंतप्रधान आईला भेटण्यास गुजरातला आले होतं. त्यापूर्वी, पंजाब, उत्तरप्रदेश, गोवा विधानसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदी यांनी आईची भेट घेतली होती.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी गुरूवारी आयोजित करण्यात आलेल्या रोड शो उपस्थिती लावली. या रोड शोला किमान १० लाख लोकांनी हजेरी लावल्याची माहिती मिळत आहे. ५० किलोमीटर असलेला हा रोड शो १४ विधासनभा मतदारसंघातून गेला होता. १० लाख उपस्थितीसह हा देशातील सर्वात मोठा रोड शो असल्याचं सांगितलं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi meet mother heeraben modi in gandhinagar ssa