नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी युक्रेनमधील अलीकडील भेटीबाबत चर्चा केली. तसेच युक्रेनबरोबरच्या संघर्षावर लवकर, कायमस्वरूपी आणि शांततापूर्ण ठरावास पाठिंबा देण्याच्या भारताच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. ‘दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या उपायांवरही चर्चा केली’, असे ‘एक्स’वरील एका संदेशात मोदी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> जन्माष्टमीच्या प्रसादातून विषबाधा; मथुरेतील घटना, १२०हून भाविक रुग्णालयात दाखल

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘रशिया-युक्रेन संघर्षावर सद्या:स्थितीबाबत माहिती दिली. दोन्ही देशांमधील संघर्षावर लवकर, कायमस्वरूपी आणि शांततापूर्ण ठरावासाठी भारताच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.’ पंतप्रधानांनी सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनाही युक्रेन भेटीची माहिती दिली. संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून या प्रदेशात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. संभाषणात २२व्या भारत-रशिया द्विपक्षीय शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी गेल्या महिन्यात रशियाच्या यशस्वी भेटीची आठवण करून दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मोदींची बायडेन यांच्याकडून प्रशंसावॉशिंग्टन

युक्रेन भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांततेचा संदेश आणि मानवतावादी पाठिंबा दिल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांचे कौतुक केले आहे. मोदी यांनी कीव येथे ऐतिहासिक भेट दिल्यानंतर मुत्सद्देगिरीद्वारे शांतता लवकर परत येण्याच्या शक्यतांवर चर्चा केली, यानंतर बायडेन यांनी त्यांचे कौतुक केले. बायडेन आणि मोदी यांच्यात सोमवारी दूरध्वनीवरून संभाषण झाले. युक्रेन आणि रशियाने युद्ध संपवण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्यास भारत तयार आहे, असे मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना सांगितले. ‘आम्ही हिंदप्रशांत महासागरात योगदान देण्यासाठी एकत्र काम करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी केली, असे बायडेन म्हणाले.