निवडणुक रणनितीकार अशी ओळख असलेले प्रशांत किशोर ( Prashant Kishor ) काँग्रेसमध्ये ( Congress ) जवळपास गेले आहेत अशी चर्चा सुरु होती. गेले काही दिवस सोनिया गांधी ( Sonia Gandhi ) आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर प्रशांत किशोर यांनी प्रदीर्घ चर्चा केली होती. प्रशांत किशोर यांनी या बैठकीत एक प्रदीर्घ सादरीकरण केलं होतं, २०२४ च्या लोकसभा निवणडुकीबाबत काँग्रेससमोर असलेल्या आव्हानांबद्दलचे मुद्दे प्रशांत किशोर यांनी मांडले. तेव्हा या मुद्द्यांवर एक गट स्थापन करत त्याबद्दलचा अहवाल तयार करण्याचे आदेशही सोनिया गांधी यांनी तात्काळ दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असं असतांना प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेला अचानक पुर्णविराम मिळाला आहे.काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत याबाबत खुलासा केला आहे. “प्रशांत किशोर यांच्या सादरीकरणावर आधारीत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर एका कृती गटाची स्थापना काँग्रेस अध्यक्षांनी केली. प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत या गटाबरोबर काम करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. प्रशांत किशोर यांनी ही मागणी नाकारली आहे. प्रशांत किशोर यांनी पक्षासाठी मांडलेल्या सुचनांचे हे स्वागत आहे”, असं रणदीप सुरजेवाला ट्विटमध्ये म्हणाले.

तर प्रशांत किशोर यांनीही ट्विट करत खुलासा केला आहे. ” कृती गटाचे सदस्य होत काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची ऑफर मी नाकारत आहे. खरं तर माझे नम्र म्हणणे आहे की माझ्यापेक्षा पक्षाला नेतृत्वाची गरज आहे आणि संघटनात्मक बदल करत पक्षामधील समस्या सामुहिकपणे दूर करणे आवश्यक आहे “, असं प्रशांत किशोर म्हणाले.

तेलंगणा राज्यातील सत्ताधारी पक्ष ‘तेलंगणा राष्ट्र समिती’ बरोबर असलेल्या संबंधावरुन प्रशांत किशोर आणि काँग्रेस यांच्यातील चर्चा फिस्कटली असावी असा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे. एवढंच नाही तर काँग्रेसची ऑफर नाकारल्यावर प्रशांत किशोर गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यांच्या निवडणुकीसाठी काय भुमिका घेणार हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे निवडणुक रणनितीकार प्रशांत किशोर पुढे काय पाऊल उचलणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant kishor declines offer to join congress party says congress itself needs asj