अयोध्येत प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिर उभारलं जातं आहे. या ठिकाणी रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्याची तयारीही जोरात सुरु आहे. १५ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत एका दिवसात राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित असणार आहेत. तसंच अयोध्येत सात दिवसांचा उत्सवही साजरा केला जाईल. श्रीराम जन्म भूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने याच संदर्भातलं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे निमंत्रण पत्र पाठवण्यात आलं आहे त्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांमध्ये ते भारतात कधी आहेत त्या तारखा लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींकडून तारीख घेतली जाईल. याच दरम्यान अयोध्येत विमानतळ आणि रेल्वेस्टेशनच्या कामांचाही वेग वाढवण्यात आला आहे. अयोध्येचं राम मंदिर आणि हनुमान गढी मंदिर या ठिकाणी असलेल्या रस्त्याचंही काम सुरु आहे. कारण भक्तांना राम मंदिरातून तिथे सहजगत्या जाता आलं पाहिजे हा यामागचा उद्देश आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे या कामावर बारकाईने लक्ष टेवून आहेत.
इंडिनयन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार सोमवारी मंदिर निर्माण समितीची एक बैठक पार पडली. त्यामध्ये रामाची मूर्ती मंदिरात कधी स्थापन करायची? या विषयावर चर्चा झाली. पत्रकारांशी चर्चा करताना विश्वस्त मंडळाचे महासचिव चंपत राय यांनी म्हटलं आहे की आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात आम्ही हे म्हटलं आहे की तुम्ही तुमच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढा. चंपत राय यांनी ही माहिती दिली आहे की डिसेंबर महिन्यात मूर्तीची प्राणपतिष्ठा केली जाईल आणि २०२४ जानेवारी महिन्यात मंदिराचं उद्घाटन केलं जाऊ शकतं.