बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘संघमुक्त भारत’ करण्यासाठी गैरभाजप पक्षांना आवाहन केल्याबद्दल केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी त्यांची थट्टा केली असून, नितीश यांची ‘चांगले नट’ म्हणून संभावना केली आहे. भाजप व संघासोबत १७ वर्षे काढली तेव्हा त्यांना काही चुकीचे दिसले नाही. आता त्यांनी वेगळा राग आलापणे सुरू केले असून ते देशाला संघमुक्त करू इच्छितात. खरेच, नितीश कुमार हे किती चांगले अभिनेते आहेत! असे पासवान पत्रकारांना म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram vilas paswan comment on nitish kumar