देशातील सर्वात श्रीमंत आमदाराकडे तब्बल १,४०० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे. तर पश्चिम बंगालमधील एका आमदाराच्या नावावर २,००० रुपयेसुद्धा नाहीत. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालानुसार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे १,४१३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. देशातल्या सर्वात श्रीमंत आमदारांची यादी पाहिली तर लक्षात येईल की, या यादीतले पहिले तिन्ही आमदार कर्नाटकमधील आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एडीआरच्या अहवालानुसार के. एच पुट्टास्वामी गौडा हे देशातले दुसरे सर्वात श्रीमंत आमदार आहेत. गौडा हे अपक्ष आमदार आहेत. त्यांच्याकडे १,२६७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्यापाठोपाठ प्रिया कृष्णा यांचा नंबर लागतो. त्यांच्याकडे १,१५६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. सपंत्तीबद्दल प्रश्न विचारल्यावर डी. के. शिवकुमार म्हणाले, मी सर्वात श्रीमंत नाही. त्याहून महत्त्वाचं म्हणजे सर्वात श्रीमंत नसलो तरी गरीबही नाही. मी स्वतःला श्रीमंत मानत नाही, कारण माझ्याकडे जी संपत्ती आहे, ती कमवायला मला खूप वेळ लागला आहे.

देशातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत पहिल्या १० पैकी चार आमदार काँग्रेसचे आणि तीन भारतीय जनता पार्टीचे आहेत. या मुद्द्यावरून भाजपा आणि काँग्रेस पक्षांमधील नेत्यांकडून एकमेकांवर टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. काँग्रेस आमदार रिझवान अर्शद म्हणाले, शिवकुमार यांच्यासारखे लोक व्यावसायिक आहेत आणि त्यात चुकीचं काय आहे? तुम्ही भाजपा आमदारांकडे जरा पाहा. प्रामुख्याने खाण घोटाळ्यातील आरोपींकडे पाहा. काँग्रेस आमदार रिझवान अर्शद यांच्या वक्तव्यावर भाजपाने पलटवार केला आहे. कर्नाटक भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश कुमार म्हणाले, काँग्रेसला श्रीमंत लोक आवडतात.

हे ही वाचा >> “विशेष सोयींचा गैरफायदा घेऊ नका”, सरन्यायाधीशांनी न्यायमूर्तींना सुनावलं; ‘त्या’ घटनेचा दिला दाखला!

सर्वात कमी संपत्ती असणारे आमदार

देशातील आमदारांच्या संपत्तीवरून बनवलेल्या यादीत सर्वात शेवटचा क्रमांक (सर्वात कमी संपत्ती असलेले आमदार) पश्चिम बंगालमधील भाजपा आमदार निर्मल कुमार धारा यांचा आहे. त्यांची एकूण संपत्ती केवळ १,७०० रुपये इतकी आहे. तसेच ओडिशातील अपक्ष आमदार मकरंदा मुदुली यांच्याकडे केवळ १५,००० रुपये इतकीच संपत्ती आहे. पंजाबचे आम आदमी पार्टीचे आमदार नरिंदर पाल सिंह यांच्याकडे केवळ १८,३७० रुपयांची संपती आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Richest mla in india has 1413 worth poorest mla has just 1700 rupees asc