Video : “पाकिस्तानी लोकांना वाटतं फाळणी ही मोठी चूक होती”, मोहन भागवत यांचं वक्तव्य; म्हणाले, “भारताने पाकिस्तानवर आक्रमण…”

फाळणीनंतर सात दशकं उलटली तरी पाकिस्तानमधले लोक अजून दुःखी आहेत, असं मोहन भागवत म्हणाले.

Mohan Bhagwat
क्रांतिकारक हेमू कालाणी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते. (PC : Twitter/@VertigoWarrior)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत शुक्रवारी एका भाषणादरम्यान म्हणाले की, स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही पाकिस्तानमधील लोक आनंदी नाहीत. आता त्यांना मान्य आहे की, भारताची फाळणी ही एक चूक होती. क्रांतिकारक हेमू कालाणी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते. देशाच्या विविध भागातील सिंधी समाजातील लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

भागवत म्हणाले, अखंड भारत हेच सत्य आहे, खंडित भारत एक दु:स्वप्न आहे. भारतापासून वेगळे होऊन स्वतंत्र पाकिस्तानला सात दशकांहूनही अधिक काळ लोटला तरी तिथले लोक दुःखी आहेत. परंतु भारतात सूख आहे. क्रांतिकारक हेमू कालाणी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सिंधी समुदायाला भागवत संबोधित करत होते. यावेळी भागवत म्हणाले की, आपल्याला नवा भारत निर्माण करायचा आहे.

भागवत म्हणाले की, ज्याला आपण पाकिस्तान म्हणतोय तिथले लोक म्हणतायत त्यांची चूक झालीय. त्यांच्या कट्टरतेमुळे ते भारतापासून वेगळे झाले, संस्कृतीपासून वेगळे झाले. पण ते आता सुखी आहेत का? इथे (भारतात) सुख आहे आणि तिथे (पाकिस्तानात) दु:ख आहे. कारण जे योग्य आहे ते टिकतं आणि चुकीचं आहे ते संपतं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तयार राहा, कसं होईल, काय होईल हे मला माहिती नाही. भारतानं पाकिस्तानवर आक्रमण करावं असं मला वाटत नाही. कारण आपण आक्रमणकारी नाही आहोत. तशी आपली संस्कृती नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 09:32 IST
Next Story
भारताबरोबर संबंध दृढ करण्याचा रशियाचा मनोदय
Exit mobile version