Shinde vs Thackeray: शिंदे 'धनुष्यबाण' चिन्हावर दावा करु शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, आयोग म्हणालं "जर तुम्ही..." | Shinde vs Thackeray Election Commission Uddhav Thackeray CM Eknath Shinde bow and arrow poll symbol sgy 87 | Loksatta

Shinde vs Thackeray: शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, निवडणूक आयोग म्हणालं “जर तुम्ही…”

शनिवारी संध्याकाळपर्यंत उत्तर दाखल करा, निवडणूक आयोगाचा शिवसेनेला आदेश

Shinde vs Thackeray: शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, निवडणूक आयोग म्हणालं “जर तुम्ही…”
दोन्ही गटांच्या कागदपत्रांची सत्यता तपासून अंतिम निर्णय घेण्याची विनंती

एकनाथ शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत. त्यांनी आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी स्वेछेने पक्ष सोडला असल्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. शिवसेना आणि शिंदे गटामध्ये ‘धनुष्यबाण’ चिन्हासाठी सुरु असलेली निवडणूक आयोगापर्यंत पोहोचली असून आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. निवडणूक आयोगाने शिवसेनेला एकनाथ शिंदेंच्या दाव्यावर शनिवारी संध्याकाळपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितलं आहे.

निवडणूक आयोगाने पत्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना ८ ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह आपली बाजू मांडण्याचा आदेश दिला आहे. जर शिवसेनेच्या वतीने कोणतंही उत्तर आलं नाही, तर याप्रकरणी योग्य तो निर्णय घेतला जाईल असंही निवडणूक आयोगाने पत्रात स्पष्ट केलं आहे.

‘अवघ्या दीड वर्षाच्या नातवालाही नाही सोडलं’, उद्धव ठाकरेंच्या टीकेने एकनाथ शिंदे व्यथित, संताप व्यक्त करत म्हणाले “ज्या दिवशी…”

‘‘शिवसेनेच्या बहुसंख्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी, तसेच अध्यक्षपदी निवड केलेली असल्याने पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे’’ असा अर्ज शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे. उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे समर्थन नसतानाही हा गट बेकायदेशीरपणे अंधेरी पोटनिवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची शक्यता असल्याने या अर्जावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती शिंदे गटाने केली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने हा आदेश दिला आहे.

शिंदे गटाने अर्जात काय म्हटलं आहे?

‘‘शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदार, १८ पैकी १२ खासदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. तसंच प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे ‘मुख्य नेता’ तसेच अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. १४४ पक्षाचे पदाधिकारी आणि ११ राज्यांच्या प्रमुखांनी शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. शिवसेनेचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचा शिंदे यांना पाठिंबा आहे’’, असं या अर्जात नमूद करण्यात आलं आहे. या दाव्याच्या पुष्टर्थ प्रतिज्ञापत्र तसंच अन्य कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत.

हेही वाचा >>> विश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय?

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून, शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. निवडणूक अर्ज दाखल करण्याची मुदत ही १४ ऑक्टोबरपर्यंत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“मी श्रीराम, श्रीकृष्णाला देव मानणार नाही, पूजाही करणार नाही,” दिल्लीतील धर्मांतराच्या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल, भाजपा संतापली

संबंधित बातम्या

आदित्य ठाकरेंनी CM शिंदेंना जाहीर चर्चेचं आव्हान दिल्यानंतर भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “माजी मुख्यमंत्री घरी…”
Video: सून भाजपाची उमेदवार, पण रवींद्र जाडेजाच्या वडिलांचा काँग्रेससाठी प्रचार; व्हिडीओ व्हायरल!
The Kashmir Files Controversy: “नदाव लॅपिड इस्त्रायमधले जितेंद्र आव्हाड”
सतत उलट्या होत असल्याने रुग्णालयात जाऊन केली तपासणी, पोटात असं काही सापडलं की डॉक्टरही चक्रावले
“मंत्रिपद चुलीत घाला” नाराजीनाट्यानंतर बच्चू कडूंचं मोठं विधान; म्हणाले, “नवीन सुखाची पाऊलवाट…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Delhi Murder Case: श्रद्धा खून प्रकरणाला वेगळं वळण? आफताबकडून पॉलीग्राफी चाचणीत धक्कादायक खुलासे
बँकेत नोकरी करून चित्रपटांमध्ये काम करायचे संकर्षण कऱ्हाडेचे वडील, अभिनेत्याच्या भावानेच सांगितला ‘तो’ प्रसंग
Fifa World Cup 2022: कतारच्या अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; विश्वचषकाच्या तयारीत ४०० ते ५०० मजुरांचा मृत्यू, पाहा व्हिडिओ
“अशा मुख्यमंत्र्यांना गडावर जाऊन…”; संजय राऊतांचं विधान!
पुणे: हाॅटेलमध्ये हाणामारी; १३ जणांच्या विरोधात गुन्हा; वारजे भागातील घटना