वाई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र आणि कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी तसेच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवी दिल्ली येथे “छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक” उभे करावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे दिल्ली येथे केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीत आज आज केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी याबाबत मागणी करत तसेच पत्रही श्री. शाह यांना दिले. या भेटीत अमित शाह यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखणारा कायदा आणावा. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे, अशी मागणीही त्यांनी श्री. शाह यांच्याकडे केली.

छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. ते संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे त्यांचा कोणी अवमान करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी आगामी अधिवेशनात राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखण्यासाठी नवीन कायदा मंजूर करावा अशीही मागणी केली. त्याबाबत कायदेतज्ञ आणि अभ्यासकांशी चर्चा करू असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. तसेच या मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकर भेटीचे आश्वासन शाह यांनी यावेळी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित महत्वाची ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू, चित्रे परदेशातील विविध संग्रहालयातून भारतात आणण्यासाठी राष्ट्रीय स्मारक फार गरजेचे आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : “त्यांना आता इतके आजार झाले की…”; एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर, प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाच्या धोरणाला काही कुटील प्रवृत्ती सुरूंग लावताना दिसत आहेत. त्यातून वादंग उठत असून महाराजांचा सातत्याने अवमान होत आहे. यापार्श्वभुमीवर शिवाजी महाराजांचा अधिकृत इतिहास जगासमोर येण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने व्यापक समिती नेमून खरा इतिहास नव्याने मांडला पाहिजे. हा इतिहास खंड रूपात तसेच विविध भाषांमध्ये प्रकाशित करावा. हे काम गुणवत्तेच्या आधारावर झाले तर इतिहासाची मोडतोड करण्याच्या प्रयत्नांना पायबंद बसेल आणि सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivaji maharajs national memorial should be irected in delhi demand by udayanraje to amit shah asj