केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी आपल्या बेगूसराय मतदारसंघातील लोकांना सांगितले की, सरकारी अधिकाऱ्यांनी जर तुमच्या तक्रारी ऐकल्या नाहीत तर त्यांनी बांबूच्या काठीने फटके द्या.

शनिवारी बिहारच्या बेगूसराय येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना गिरीराज सिंह यांनी लोकांना त्यांच्या समस्येबद्दल संवेदनहीन असलेल्या अधिकाऱ्यांना “बांबूच्या काठीने मारण्याचा” सल्ला दिला.

आपल्या वादग्रस्त टीकांसाठी गिरीराज सिंह प्रसिध्द आहेत. सरकारी अधिकारी वारंवार लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असतात. सामान्य नागरिकांकडून अशा तक्रारी वारंवार त्यांच्याकडे केल्या जातात, यावर ते बोलत होते. गिरीराज म्हणाले की, “याने जर समस्या सुटल्या नाहीत तर मी तुमच्या पाठीशी उभा राहीन ,” असे गिरीराज म्हणाले.

मागे गिरिराज सिंह यांनी राहुल गांधींच्या हम दो हमारे दो वक्तव्याबद्दल टीका केली होती, ते म्हणाले की, गांधींनी या घोषणाचा संदर्भ स्वत:साठी दिला होता. ते स्वत:, त्यांची आई, त्यांची बहीण आणि त्यांच्या बहीणीचा पती यांच्याबद्दल ते बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात अर्थसंकल्पाबद्दल साधा एक शब्दही उच्चारला नाही, यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिलं होतं.