विनेश फोगट आणि बजरंग पुनिया या दोघांनीही काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेता आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय या दोघांनीही घेतला आहे. काँग्रेसकडून या दोघांनीही आमदारकीचं तिकिट मिळण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे. विनेशची मैत्रीण महिला मल्ल साक्षी मलिक हिने काँग्रेसमध्ये जायचा निर्णय हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे असं म्हटलं आहे. आमचं आंदोलन महिलांसाठी होतं, महिलांवरच्या अन्यायासाठी होते. मलाही ऑफर होती. पण मी एक चांगली सुरुवात केली आहे, कुस्ती फेडरेशनमध्ये जोपर्यंत अन्याय थांबत नाहीत तोपर्यंत माझी लढाई थांबणार नाही असं साक्षी मलिकने म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागच्याच महिन्यात पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमुळे विनेश फोगटची चर्चा रंगली होती. विनेश फोगटचं वजन १०० ग्रॅम जास्त भरलं होतं. त्यामुळे तिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं होतं. तसंच ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत महिला मल्लांनी जे आंदोलन केलं त्यातही विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांची चर्चा झाली होती कारण या दोघींनी या आंदोलनासाठी पुढाकार घेतला होता. तसंच बजरंग पुनियाने या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आता बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पैलवानांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेऊनही चर्चा केली होती. आपल्या देशातले मल्ल राजकीय चक्रव्युहात अडकले आहेत असं राहुल गांधी यांनी खट्टर यांना सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinesh phogat and bajrang punia join congress today haryana election 2024 scj