Taj Mahal Leakage: दिल्ली, उत्तर प्रदेश आणि आग्रा येते मागच्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्यामुळे जागतिक वारसा स्थळातील पर्यटन स्थळ असलेल्या ताजमहाल परिसरात पाणीच पाणी झाले आहे. ताजमहालच्या तीन घुमटांपैकी मुख्य घुमटातून पाण्याची गळती सुरू झाल्याचे भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गुरूवारी ताजमहाल परिसरातील उद्यानात पाणी साचल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर पर्यटकांचे लक्ष ताजमहालन पुन्हा वेधून घेतले. भारतीय पुरातत्व विभाग, आग्रा येथील अधिकाऱ्यांनी सांगिते की, मुसळधार पावसामुळे मुख्य घुमटातून गळती सुरू झाली असली तरी अद्याप ताजमहालचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आग्रा विभागाच्या पुरातत्व खात्यामधील अधीक्षक प्रमुख राजकुमार पाटील यांनी पीटीआयशी सांगितले, “ताजमहालमध्ये पाण्याची गळती होत असल्याची बातमी खरी आहे. आम्ही मुख्य घुमटाची तपासणी केली असून पावसामुळे ही गळती होत असल्याचे दिसून आले. तसेच ड्रोन कॅमेऱ्याने आम्ही घुमटाची तपासणी केली आहे.” गुरुवारी ताजमहाल परिसरात पाणी साचल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे पर्यटकांचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर अनेकजण याठिकाणी व्हिडीओ काढण्यासाठी येऊ लागले.

हे वाचा >> ताजमहाल पूर्वी शिवमंदिर होते काय?

आग्रा येथील स्थानिक आणि सरकारमान्य गाईड असलेल्या मोनिका शर्मा यांनी दी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, ताजमहाल आग्रा आणि संपूर्ण देशाचा अभिमान आहे. ताजमहालमुळे आग्र्यातील हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. सरकारने ताजमहालची विशेष काळजी घेतली पाहीजे. कारण येथील लोकांसाठी आणि पर्यटनासाठी ताजमहालचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

हे ही वाचा >> इंग्रज ताजमहाल चोरून नेणार होते? इतिहासातील पुरावे काय सांगतात?

आग्रा येथे तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक भागात पाणी साचले आहे. पावसामुळे येथील एक राष्ट्रीय महामार्ग जलमय झाला आहे, काही भागातील शेतात तळे साचले असून पिके वाया गेली आहेत तर शहरात महाग घरे असलेल्या भागातही पाणी साचले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water leakage in main dome of taj mahal due to incessant rain in agra archaeological dept clear damage to monument kvg