What Is Lakhpati Didi Scheme: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अंतरिम अर्थसंकल्प २०२४ चे भाषण हे भारताच्या अर्थमंत्र्यांच्या सर्वात कमी वेळेतील भाषणांपैकी एक होते, परंतु या कमी वेळेतील भाषणात त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. सीतारमण यांनी म्हटले की, “आम्ही गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी अशा चार घटकांवर आम्ही विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याअंतर्गत एका योजनेची माहिती देत, सीतारमण यांनी ‘लखपती दीदी’ चा उल्लेख केला. १ फेब्रुवारी २०२४ ला सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात लखपती दीदी योजनेचा आवाका दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्यात आला आहे. या योजनेच्या पूर्वीच्या यशाबाबत अर्थमंत्र्यांनी सांगितले की, “आतापर्यंत ९ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाला आहे. लखपती दीदींमुळे अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. अंगणवाडी कार्यक्रमांना गती दिली जात आहे. आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी करण्यात आले आहे”. पण नेमकी ही लखपती दीदी योजना आहे काय? त्याचा लाभ कोणाला घेता येणार आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे लखपती दीदी योजना?

१५ ऑगस्ट २०२३ ला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान पहिल्यांदा लखपती दीदींबद्दल भाष्य केले होते. लखपती दीदी योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारची योजना आहे.

लखपती दीदी योजनेचा शुभारंभ करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना सरकारकडून विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. त्याशिवाय अशा महिलांना सरकार आर्थिक मदतही करेल, ज्यामुळे त्यांना लखपती होण्यास मदत होईल. ज्या महिलांचे प्रति कुटुंब वार्षिक उत्पन्न किमान १ लाख रुपये आहे ते या महिला केंद्रीत योजनेचा लाभ घेऊ शकतात.

योजनेत महिला बचत गटांना एलईडी बल्ब बनवणे, प्लंबिंग, ड्रोन रिपेअरिंग इत्यादी तांत्रिक कौशल्ये शिकवून त्यांना स्वावलंबी बनवले जाईल. बचत गटात सहभागी होऊन योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेची माहिती मिळवण्यासाठी इच्छुक महिला त्यांच्या जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधू शकतात.

हे ही वाचा << Budget 2024 मध्ये कर्मचारी वर्गासाठी खुशखबर? आठवड्यात ४ दिवस काम, ३ दिवस सुट्टी, पण सत्य काय?

लखपती दीदी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • बँक खात्याचा तपशील
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक
  • ई – मेल आयडी

दरम्यान, गुरुवारी सीतारमण यांनी त्यांचा विक्रमी सहावा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प होता. लोकसभा निवडणुकीच्या वर्षात अर्थमंत्री अंतरिम अर्थसंकल्प सादर करतात. नवीन सरकार निवडून आल्यावर संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जातो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget 2024 highlight lakhpati didi scheme what are benefits you get from central govt documents required pm modi said what svs