Why People Wear Watch In Left Hands: मागील काही वर्षात जगाची माहिती ठेवणाऱ्या मोबाईलमुळे वेळ पाहण्यासाठी घड्याळाची गरज कमी झाली होती पण याच वेळी घड्याळ निर्मात्यांनी नवनवीन फीचर लाँच करायला सुरु केले. आज घडीला मोबाईलचे नोटिफिकेशन सुद्धा घड्याळात बघण्याची सोय झाली आहे. याशिवाय तुम्ही दिवसभरात किती पाणी पिता, किती पाऊले चालता तुमच्या हृदयाचे ठोके काय अंतराने पडतायत या सगळ्याचे रेकॉर्ड्स तुमच्या घड्याळ्यात असतात. घड्याळाचे रूप, काम आणि स्टाईल कितीही बदलली असली तरी एक गोष्ट मात्र या घड्याळांमध्ये कॉमन आहे ती म्हणजे घड्याळ वापरण्याची पद्धत. स्त्री- पुरुष, लहान मुले ते अगदी वयस्कर आजी आजोबा कोणीही घड्याळ घालताना बहुतांश वेळा डाव्याच हातात घातले जाते. यामागे नेमके कारण

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एरवी बहुतांश माणसे ही उजव्या हाताचा एकाधिक कामासाठी वापर करतात असे असताना पण उलट्या हातात म्हणजेच डाव्या हातात घड्याळ का घातले जाते. आपला उजवा हात हा बहुतेक वेळेस काही ना काही काम करण्यात गुंतलेला असतो. घड्याळ उजव्या हातात घातलेले असेल तर मग प्रत्येक वेळेस वेळ बघताना आपण करीत असलेल्या कामात खंड पडण्याची शक्यता उद्भवते.

उदा. समजा तुम्ही चहाचा कप उजव्या हाताने चहा पिण्यासाठी उचलला आणि नेमके त्याच वेळेस तुम्हाला कोणीतरी विचारले “किती वाजले?” तर वेळ बघताना चहा पडून काय होईल याचा तुम्हीच विचार करा. याशिवाय अँटीहा घड्याळ डाव्या हातात असेल तर असा काही दोष संभवत नाही. आता राहता राहिला प्रश्न तुमच्याही मनातला, जी लोकं मुळातच डावखोर आहेत त्यांचं काय? ही मंडळी सोयीने घड्याळ उजव्या किंवा डाव्या कोणत्याही हातात घालतात.

हे ही वाचा<< समीर वानखेडे यांचा पगार किती? NCB मधील पद व मालमत्ता ऐकून व्हाल थक्क

बरं का मित्रांनी घड्याळ कोणत्या हातात घालावे याचा तसा काही इतिहास नाही कारण पहिल्यांदा जेव्हा घड्याळ बनले होते तेव्हा ते हातात घालण्याच्या हेतूने बनवलेलेच नव्हते. हे घड्याळ पॉकेट वॉचच्या रूपात होते. त्यामुळे डाव्या हातात घड्याळ घालण्याचा अलिखित नियम हा केवळ सोयीनुसार बनवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did you know why people wear watch in left hands only interesting unknown facts in marathi general knowledge about clock svs