Indian Railway: रेल्वे हे भारतातील वाहतुकीचे सर्वाधिक पसंतीचे साधन मानले जाते. भारतातील सर्वाधिक लोक प्रवासासाठी रेल्वेचा वापर करतात. यामुळे भारतीय रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क मानले जाते. देशातील जवळपास प्रत्येक मोठे शहर या रेल्वे नेटवर्कने जोडलेले आहे. यात प्रवाशांच्या गरजा आणि सोयी लक्षात घेऊन रेल्वेकडून वेगवेगळ्या कॅटेगरीचे तिकिट पुरवले जाते. यात फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी, स्लीपर आणि जनरल क्लासची तिकिटे उपलब्ध आहेत. यातील जनरल तिकिटाची किंमत सर्वात कमी आहे. पण जनरल तिकीट किती तास वॅलिड आहे याची माहिती बहुतांश रेल्वे प्रवाशांना नसते. पण नियमांची माहिती नसल्याने अनेक प्रवासी अडचणीत येतात आणि तिकीट काढल्यानंतरही त्यांना दंड भरावा लागतो.
जर तुम्हाला वाटत असेल की, जनरल तिकीट खरेदी केल्यानंतर तुम्ही दिवसभरात कधीही ट्रेनमध्ये चढू शकता, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण रेल्वेचे तिकीट खरेदी केल्यानंतर ट्रेन पकडण्यासाठी कालमर्यादा निश्चित केली आहे. रेल्वे तिकीट नियमांनुसार, जर एखाद्या प्रवाशाला १९९ किलोमीटरपर्यंतचा प्रवास करायचा असेल तर, प्रवाशाने जनरल तिकीट खरेदी केल्यानंतर ३ तासांच्या आत ट्रेनमध्ये चढावे लागते. तसेच २०० किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतरासाठी जनरल तिकिट ३ दिवस अगोदर खरेदी करता येतील. जर एखाद्या प्रवाशाने १९९ किलोमीटरपेक्षा कमी अंतराच्या प्रवासासाठी तिकीट खरेदी केले, तर त्याला त्याच्या गंतव्य स्थानकावर जाणारी पहिली ट्रेन सुटण्यापूर्वी किंवा तिकीट खरेदी केल्यानंतर ३ तासांच्या आत प्रवास सुरू करावा लागेल.
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railways general train tickets valid for three hours after purchase catching train after this period can land you in trouble sjr