भारतामध्ये पहिली रेल्वे (Indian Railway) धावल्यानंतर काही वर्षांमध्ये ब्रिटीशांनी देशभरामध्ये त्यांच्या सोयीसाठी रेल्वेचे जाळे पसरले. मे १८३६ मध्ये भारतीय रेल्वेची स्थापना करण्यात आली असे म्हटले जाते. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५१ मध्ये या विभागाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. तेव्हापासून रेल्वे मंत्रालय भारतीय रेल्वे विभागाची जबाबदारी सांभाळत आहे. रेल्वेच्या या जाळ्याची एकूण लांबी ६७,४१५ कि.मी. इतकी आहे. जगातील चौथी सर्वांत मोठ्या रेल्वेसेवा असलेल्या भारतीय रेल्वेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.
या विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. अश्विनी वैष्णव हे भारताचे रेल्वे मंत्री आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ सादर करताना रेल्वे विभागाच्या भांडवली खर्चासाठी एकूण २.४० लाख कोटी रुपये राखून ठेवले असल्याचे सांगण्यात आले. तेरा लाखांपेक्षा जास्त कर्मचारी रेल्वे विभागामध्ये कार्यरत आहेत.Read More
पुणे रेल्वे स्थानकावर या कार्यक्रमास राजस्थानमधील पालीचे खासदार पी.पी.चौधरी आणि सुमेरपूरचे आमदार जोराराम कुमावत यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात इटारसी-नागपूर दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम सुरू असून त्याअंतर्गत पांढुर्णा स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि यार्डमध्ये फेरबदल करण्यात…