Story of Chinese Kali temple, Kolkata : आपल्या देशात विविध जाती-धर्माचे लोक अनेक वर्षांपासून एकोप्याने रहात आहेत. भारताच्या प्रत्येक भागात लहान मोठी अशी असंख्य मंदिरे आहेत. काही मंदिरांच्या निर्मितीमागील, स्थानिक गोष्टींमुळे ती मंदिरे प्रसिद्ध असतात; तर काही मंदिरं ही तिथे देवतांना आणि भाविकांना दिल्या जाणाऱ्या प्रसादासाठी म्हणून प्रसिद्ध असतात. देवळात जाताना देवाच्या चरणी आपण सहसा गोडाचे पदार्थ, मिठाई प्रसाद म्हणून ठेवतो. मात्र, कोलकातामधील तंगरा या भागात काली मातेच्या मंदिरात चक्क नूडल्स, मोमो यांसारखे चायनीज पदार्थ प्रसाद म्हणून दिले जातात. या मंदिराचे नाव हे ‘चायनीज काली माता मंदिर’ असे आहे. या मंदिरामागे आणि तिथे मिळणाऱ्या प्रसादामागची नेमकी गोष्ट काय पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चायनीज काली माता मंदिराची गोष्ट :

१९३० च्या युद्धादरम्यान अनेक चिनी नागरिकांनी कोलकातामधील तंगरा भागात आश्रय घेतला होता. सुमारे सहा दशकं तिथे राहणारे रहिवासी हे एका झाडाखाली असणाऱ्या दोन दगडांना कुंकू लावून त्यांची मनोभावे पूजा करत. मात्र, एके दिवशी एक दहा वर्षांचा चिनी मुलगा एकाएकी प्रचंड आजारी पडला. कोणत्याही औषधांचा त्याच्यावर परिणाम होत नव्हता. कोणत्याही गोष्टींचा परिणाम होत नाही हे समजल्यावर, त्या चिनी मुलाच्या आई-वडिलांनी झाडाखाली ठेवलेल्या त्या दोन दगडांकडे त्यांच्या मुलाची तब्येत सुधारण्यासाठी प्रार्थना केली.

हेही वाचा : कबाब या पदार्थाला सीख, शामी, अशी नावं कशी बरं पडली? काय आहे त्यांच्या नावांमागची गोष्ट? पाहा

त्यांनी प्रार्थना केल्यावर जणू एखाद्या चमत्काराप्रमाणे त्या दहा वर्षांच्या मुलाची तब्येत सुधारली. या चमत्कारानंतर, कृतज्ञतेच्या भावनेतून त्या चिनी जोडप्याने त्यांच्या चिनी समाजाकडून त्या दोन दगडांसाठी सुंदर मंदिर बनवण्यासाठी निधी गोळा केला. गोळा केलेल्या निधीमधून त्या झाडाखाली कुंकू लावून ठेवलेल्या दगडांसाठी व्यवस्थित असे मंदिर उभारले गेले आणि त्या मंदिराला ‘चायनीज काली माता’ मंदिर असे नाव ठेवण्यात आले. अशा पद्धतींनी दोन भिन्न संस्कृतींचे मिलन होऊन सुंदर आणि आगळ्यावेगळ्या मंदिराची निर्मिती झाली. अशी गोष्ट या मंदिराबद्दल प्रचलित असल्याचे इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील savaaricarrentals नावाच्या अकाउंटने शेअर केलेल्या व्हिडीओनुसार समजते.

चायनीज काली माता मंदिरात मिळणारा प्रसाद :

दोन वेगळ्या संस्कृतींमधून उदयास आलेल्या या आगळ्यावेगळ्या मंदिराचा प्रसादसुद्धा इतर सर्व मंदिरांपेक्षा वेगळा आहे. गेल्या ८० वर्षांपासून कोलकातामधील तंगरा भागातील स्थानिक चिनी समूह या मंदिराची देखभाल करत आहेत. या मंदिरात काली माता आणि भगवान शंकराची मूर्ती स्थापन केलेली आहे. दररोज मनोभावे या देवतांची पूजाअर्चा केली जाते. मंदिराची स्वच्छता केली जाते. रोज या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी अनेक भक्तांची / भाविकांची ये-जा असते.

दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून मोमो, नूडल्स, भाज्या आणि भात असे विविध चायनीज पदार्थ दिले जातात. या मंदिरासाठी शनिवार हा खास वार आहे. या दिवशी इतर दिवसांपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर काली मातेसाठी पूजापाठ केले जातात.

हेही वाचा : ‘जिलब्या मारुती, डुल्या मारुती…’ पुण्यातील प्रसिद्ध मारुती मंदिरांना का पडली असतील अशी नावे? जाणून घ्या…

दिवाळी सणादरम्यान इतर मंदिरांप्रमाणे हे चायनीज काली मातेचे मंदिरदेखील दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघते. मात्र, दिव्यांव्यतिरिक्त, वाईट आत्म्यांपासून, नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करण्यासाठी विशेष उदबत्त्या आणि कागद जाळले जातात. येथील प्रसाद आणि इतर पद्धतींमध्ये देवांना नमस्कार करण्याचीदेखील एक विशेष पद्धत असल्याचे द इंडियन एक्स्प्रेसच्या लेखावरून आणि इस्टाग्राम या सोशल मीडियावरील @savaaricarrentals
नावाच्या अकाउंटवरून शेअर झालेल्या व्हिडीओतील माहितीवरून समजते.

व्हिडीओ पाहा :

तुम्हाला अशा या हटके आणि भन्नाट मंदिरास भेट द्यायला आवडेल का?

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata unique chinese kali temple what is the story behind this place why they offer noodles as prasad check out in marathi dha
First published on: 23-05-2024 at 14:58 IST