Premium

चीनचे अनोखे ऑपरेशन! खोदणार तब्बल १० हजार मीटर खोल छिद्र; यामागचे कारण जाणून व्हाल थक्क

जमीनीत हे छिद्र १० महाद्वीपीय स्तरांमधून जाईल, त्यामुळे पृथ्वीच्या इतिहासाशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती उपलब्ध होऊ शकते.

China digging most deep hole in earth
चीन जमीनीत खोदणार १० हजार मीटरचे छिद्र. (Photo : Twitter)

जमिनीत ५० ते १०० फूट खाली खोदल्यास पाणी (भूगर्भातील पाणी) लागते, त्यापेक्षा जास्त खाली म्हणजे १००० फुटांनंतर कच्चे तेल आणि गॅस बाहेर पडू लागतो. कोळशासह इतर अनेक खनिजेही यापेक्षा कमी अंतरावर आढळतात. एकंदरीत, मानवाला आवश्यक असलेल्या महत्वाच्या वस्तू १००० ते २००० फुटांपर्यंत उपलब्ध होतात. पण सध्या चीन सुमारे ३२ हजार फूट म्हणजेच तब्बल १० हजार मीटर खोल छिद्र पाडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जमीनीत १० हजार मीटरचे छिद्र पाडणार –

चिनी मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिनजियांग प्रांतातील तारिम बेसिन भागात जगातील सर्वात मोठे कृत्रिम छिद्र खोदण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. हे छिद्र मोजले तर ते १० हजार मीटर पेक्षा जास्त खोलीचे असणार आहे. असे करण्यामागे चीनचा उद्देश पृथ्वीशी संबंधित अनेक रहस्ये जाणून घेणे, हा असल्याचं सांगितलं जात आहे. अवकाशासोबतच आता चीन पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली संशोधनातही वेगाने प्रगती करत असल्याचे हे उदाहरणं असल्याचंही म्हटलं जात आहे.

महत्वाची माहिती मिळणार –

हेही वाचा- बॉलिवूडमध्ये रुळणारा इंटीमसी को-ऑर्डिनेटरचा ट्रेंड नेमका आहे काय?

हे छिद्र १० महाद्वीपीय स्तरांमधून जाईल. त्याच्या मदतीने हवामान बदल, खंडांचा इतिहास, जीवसृष्टीचा विकास आणि पृथ्वीच्या इतिहासाशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती उपलब्ध होणार आहे. तसे, हे उत्खनन आणि त्यामागील खरा हेतू याविषयी चीनकडून फारशी माहिती उपलब्ध झालेली नाही.

छिद्र पाडण्यामागचा चीनचा हेतू काय?

या ऑपरेशनमध्ये काम करणारे टेक्निकल एक्सपर्ट वांग चुनशेंग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, १० मीटरपेक्षा जास्त खोल छिद्र खोदणे हे एक मोठे आणि आव्हानात्मक पाऊल आहे. याद्वारे पृथ्वीवरील अज्ञात रहस्ये समोर येतील आणि मनुष्य पृथ्वीतील अनेक रहस्यांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. या ऑपरेशनमुळे भूकंप, ज्वालामुखी, हजारो वर्षांपूर्वीचे हवामान बदल यासारख्या प्राचीन घटना आणि त्यांचा इतिहास अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल.

हेही वाचा- PVR चित्रपटगृहांत ‘I’ आणि ‘O’ हे दोन Rows नसतात; नेमकं कारण ठाऊक आहे का?

यापूर्वी रशियाने केला होता प्रयत्न –

यापूर्वी १९७० ते १९९२ या दरम्यान रशियानेही असाच प्रयत्न केला होता. २२ वर्षांत, रशियाला पृथ्वीवर फक्त १२ हजार २६२ फूट खोल छिद्र खोदता आले आहे. सध्या हे छिद्र जगातील सर्वात खोल कृत्रिम छिद्र आहे. रशियानंतर आता चीननेही या दिशेने पाऊल टाकले आहे. तर हे छिद्र पाडून पृथ्वीच्या विकासाचा इतिहास आणि त्याच्या संरचनेबद्दल अधिक माहिती मिळवाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

छिद्र पाडताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार –

चीनने हे ऑपरेशन सर्वात मोठे वाळवंट तकलीमकान येथे हे सुरू केले आहे. या भागात वाळू आणि धुळीच्या वादळाचा सामना करत काम करणे अवघड होणार आहे. अशा परिस्थितीत चीनसाठी हे उत्खनन करणे खरोखरच आव्हानात्मक ठरणार आहे. आता चीन किती खोलवर हे उत्खनन सुरू ठेवणार हे पाहण्यासारखे आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 19:34 IST
Next Story
दिल्ली, नवी दिल्ली आणि एनसीआरमध्ये नेमका काय आहे फरक, माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर