Why Airplane Windows in round shape : विमानाच्या खिडक्या तुम्ही पाहिल्याच असतील. विमान प्रवासावेळी अथवा फोटोमध्ये तरी या खिडक्या तुम्ही पाहिल्या असतील. या खिडक्या इतर वाहनं आणि रेल्वेच्या खिडक्यांपेक्षा वेगळ्या असल्याचं तुमच्या लक्षात आलंच असेल. या खिडक्यांचं वेगळेपण म्हणजे त्या आकाराने लहान व गोलाकार किंवा लंबवर्तुळाकार असतात. अनेकांना विमान प्रवासावेळी असं वाटतं की खिडकी अजून थोडी मोठी असती तर बरं झालं असतं. बाहेरचं जग अजून सहज व मनमोहक रुपात पाहता आलं असतं. विमानाची खिडकी लहान व गोल का असते असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.
विमानं १०,००० फूट उंचावरून उडतात. एवढ्या उंचीवर विमानावर हवेचा दबाव असतो. तसेच जमिनीच्या तुलनेत तेथे अधिक तापमान असतं. विमान मजबूत असतंच यासह विमानाची संरचना अशा पद्धतीने केलेली असते की कोणताही पक्षी किंवा कोणतीही वस्तू विमानाला धडकली तरी त्याने विमानाचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये. खिडक्या लहान आणि गोल असण्यामागेही विशिष्ट कारण आहे.
Simpleflying च्या अहवालानुसार विमानाच्या खिडक्या या विमानाचा महत्त्वाचा भाग असतात. मात्र या खिडक्या मोठ्या करता येत नाहीत. कारण खिडक्या मोठ्या केल्या तर विमानाची संरचणा कमकुवत होईल. विमान हवेत उडत असतं तेव्हा बाहेरच्या हवेचं विमानाच्या पृष्ठभागाशी घर्षण होत असतं. हवेचं घर्षण होत ती मागे जात असतो, विमानाच्या खिडक्या मोठ्या असतील तर यात अडथळा येऊ शकतो. त्याचबरोबर एखादी लहानशी वस्तू किंवा पक्षी मोठ्या काचेवर आदळला तर विमानाचं नुकसान होऊ शकतं. विमानाची खिडकी लहान असल्याने तिला अधिक मजबुती प्रदान करता येते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ते अधिक महत्त्वाचं आहे. या खिडक्यांना रुंद अशी चौकट असते, जेणेकरुन खिकडकीला अधिक मजबुती प्रदान करता येईल. अलीकडच्या काळात बोइंग ७६७ ड्रीमलायनरसारखी काही अत्याधुनिक विमानं उपलब्ध झाली आहेत ज्यांच्या खिडक्या मोठ्या असतात.
हे ही वाचा >> नेलकटरमध्ये अतिरिक्त दोन ब्लेड का असतात? त्यांचा उपयोग नेमका कशासाठी केला जातो? घ्या जाणून….
विमानाच्या खिडक्या गोल का असतात?
विमानाची खिडकी गोल किंवा लंबवर्तुळाकाराची का असते? असाही प्रश्न अनेकांना पडतो. गेल्या ७० वर्षांपासून जगभरात तयार होणाऱ्या विमानांच्या खिडक्या या गोलच ठेवण्यात आल्या आहेत. मात्र विमानाचा शोध लागला तेव्हा, सुरुवातीच्या काळात विमानाच्या खिडक्या गोल नव्हत्या. मात्र त्यामुळे अनेक अपघात झाले. मात्र नंतरच्या काळात अधिक संशोधन केल्यानंतर विमानाची खिडकी गोल असली पाहिजे असं मत मांडण्यात आलं. बाहेरील हवेचा दाब, हवेमुळे होणारं घर्षण याचा विचार करून विमानाच्या खिडक्या गोल बनवल्या जाऊ लागल्या. जेणेकरून हवा कोणत्याही अडथळ्याशिवाय सहजपणे मागे जात राहील.