आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. निवडणूक काळात प्रचारासाठी आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी जगनमोहन रेड्डी यांनी ‘मेमंथा सिद्धम’ बस यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा आज (१३ एप्रिल) रात्री विजयवाडा पोहोचल्यावर ते लोकांना अभिवादन करत होते. त्याचवेळी यांच्यावर दगडफेक झाली. जगनमोहन रेड्डींच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तर यावेळी त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले आमदार वेल्लमपल्ली यांच्या डाव्या डोळ्याला इजा झाली आहे. बसमध्येच डॉक्टरांनी जगनमोहन रेड्डींवर प्रथमोपचार केले. प्रथमोपचारानंतर मुख्यमंत्री रेड्डी यांनी त्यांची बस यात्रा चालू केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगनमोहन रेड्डी विजयवाडामधील सिंहनगर येथे रोड शो करत होते. त्यांची ‘मेमंथा सिद्धम’ बस यात्रा तिथे दाखल झाली होती. त्यावेळी बसवर चढून जगनमोहन रेड्डी लोकांना अभिवादन करत होते. तसेच लोकांचा जल्लोष पाहत होते. त्यांचा ताफा विवेकानंद शाळेजवळ पोहोचला. त्याच ठिकणी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. यावेळी एक दगड त्यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ लागला आणि जखम झाली. जखमेतून भळाभळा रक्त वाहू लगलं. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले सुरक्षारक्षक आणि वायएसआरच्या पदाधिकाऱ्यांनी जगनमोहन रेड्डींना बसमध्ये नेलं. बसमध्येच त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. प्रथमोपचार घेतल्यानंतर जगनमोहन यांनी पुन्हा एकदा लोकांना अभिवादन केलं आणि त्यांची बस यात्रा पुढे नेली.

हे ही वाचा >> “सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी…”, राहुल गांधींची भंडाऱ्यात अग्निवीर योजना आणि जीएसटीबाबत मोठी घोषणा

जगनमोहन रेड्डींच्या ताफ्यावर दगडफेक झाली तेव्हा त्यांच्याबरोबर तिथे उपस्थित असलेले आमदार वेल्लमपल्ली यांच्या डाव्या डोळ्याला दगड लागून गंभीर इजा झाली आहे. तिथे उपस्थित पदाधिकारी वेल्लमपल्ली यांना घेऊन त्वरीत रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, वायएसआरसीपीच्या नेत्यांनी आरोप केला आहे की, हा हल्ला तेलुगू देसम पार्टीच्या लोकांनी घडवून आणला होता.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ap cm jagan reddy injured in stone pelting during bus tour in vijayawada asc