Amrit Udyan Rashtrapati Bhavan: आझादीचा अमृत महोत्सव थीम अंतर्गत शनिवारी २८ जानेवारीला राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव बदलून त्याऐवजी अमृत उद्यान असे नामकरण झाले. तब्बल १५ एकरात पसरलेल्या या मुघल म्हणजेच आताच्या अमृत उद्यानात जम्मू- काश्मीरमधील मुघल निर्मित उद्यानांची झलक पाहायला मिळते.राष्ट्रपती भवनात असलेलं मुघल गार्डन हे त्यातल्या सुंदर फुलांसाठी प्रसिद्ध आहे. हे गार्डन पाहण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी या ठिकाणी उपस्थिती लावतात. अमृत उद्यान हे १५ एकरमध्ये पसरलेलं विस्तीर्ण उद्यान आहे. या बागेत १३८ प्रकारचे गुलाब, १० हजारपेक्षा जास्त ट्यूलिप बल्ब, ७० विविध प्रकारची ५ हजार प्रकारची मोसमी फुलं असं सगळं या बागेत आहे. हे उद्यान देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी जनतेसाठी खुलं केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुघल उद्यान हे नाव कसं पडलं?

राष्ट्रपती भवनातील मुघल आणि पर्शियन गार्डन्सपासून प्रेरित तीन बागा येथे आहेत. तुम्हाला माहित आहे का की, या बागांना अधिकृतपणे मुघल गार्डन असे नाव दिले गेले नाही, ते वास्तुकलेच्या शैलीमुळे ओळखले जाऊ लागले.

एडविन लुटियन्सने १९१७ मध्ये मुघल गार्डनचे डिझाइन पूर्ण केले होते, परंतु १९२८-१९२९ पासून इथे वृक्षारोपण सुरु करण्यात आले. द्यानांसाठी त्यांचे सहकारी फलोत्पादन संचालक विल्यम मुस्टो होते. उद्यानांसाठी त्यांचे सहकारी फलोत्पादन संचालक विल्यम मुस्टो होते. राष्ट्रपती भवनाच्या इमारतीत भारतीय आणि पाश्चिमात्य अशा दोन भिन्न शैलीच्या वास्तुकला आहेत, त्याचप्रमाणे, लुटियन्सने बागांसाठी दोन भिन्न फलोत्पादन परंपरा एकत्र आणल्या – मुघल शैली आणि इंग्रजी फ्लॉवर गार्डन. मुघल कालवे, टेरेस आणि फुलांची झुडुपे युरोपियन फ्लॉवरबेड्स, लॉन आणि खाजगी हेजेज यांचा सुंदर संगमअमृत उद्यानात पाहायला मिळतो.

मुघल गार्डन मधील बागेच्या रचनेवर व शैलीवर पर्शियन बागांचा प्रभाव होता, विशेषत: चहू बाजूंनी पसरलेली बागांची रचना, उद्यानांमध्ये तलाव, कारंजे आणि कालवे यांचा समावेश करणे ही मुघल शैली आहे. आजही अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक मुघल बागा आहेत. मुघल सम्राट बाबरने आपल्या आवडत्या बागेचे वर्णन चारबाग असे केले होते.

राष्ट्रपती भवनातील इतर उद्याने

राष्ट्रपती भवनात विविध प्रकारच्या बागा आहेत. पूर्वी राष्ट्रपती भवनात केवळ पूर्व लॉन, सेंट्रल लॉन, लाँग गार्डन आणि वर्तुळाकार गार्डन या बागा होत्या. मात्र, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम ते राम नाथ कोविंद यांच्या कार्यकाळात, हर्बल-1, हर्बल-2, टॅक्टाइल गार्डन, बोन्साई गार्डन आणि आरोग्य वनम यासारख्या अधिक उद्यानांचा विकास करण्यात आला.

कालांतराने राष्ट्रपती भवनात वास्तव्यास आलेल्या प्रत्येकाने आपापल्या परीने सामाजिक किंवा विकासात्मक कामांसाठी उद्यानांची बांधणी व उभारणी केली. सी राजगोपालाचारी, राष्ट्रपती भवनाचे पहिले भारतीय निवासी हे या बागेत गव्हाची लागवड करण्यासाठी काही भाग वापरत होते. तर राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी हर्बल गार्डन्स, नेत्रहीन लोकांसाठी टॅक्टाइल गार्डन्स आणि इतर बागांच्या निर्मितीसाठी योगदान दिले.वनौषधी उद्यान, बोन्साय बाग,मधल्या भागातील लॉन, लांबलचक बाग आणि गोलाकार बाग यांना आता एकत्रितपणे अमृत उद्यान म्हटले जाते.

हे ही वाचा<< विश्लेषण: पद्म पुरस्कार विजेत्यांची निवड कशी होते? हा पुरस्कार नाकारणारे चार भारतीय कोण होते?

अमृत उद्यानातील झाडांवर QR कोड का लावला आहे?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रेस सेक्रेटरी नविका गुप्ता यांनी माहिती दिली की मुघल गार्डनमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या सुविधेसाठी सगळ्या रोपांवर, झाडांवर क्यू आर कोड लावण्यात आला आहे. तसंच या ठिकाणी माहिती देणारे २० प्रोफेशनल गाईडही ठेवण्यात आले आहेत जे लोकांना, पर्यटकांना यासंबंधीची माहिती देऊ शकतील.

दरम्यान, अमृत उद्यानाच्या नामकरणाच्या वेळी मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारीपासून हे गार्डन सगळ्यांसाठी खुलं होणार आहे. २६ मार्च २०२३ पर्यंत हे गार्डन सुरू असणार आहे. या ठिकाणी उत्सव २०२३ साजरा होणार आहे. सोमवार आणि होळीच्य दिवशी हे गार्डन पर्यटकांसाठी बंद असणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amrit udyan why pm modi changed mughal garden name in rashtrapati bhavan why are there qr code on trees explained svs
First published on: 29-01-2023 at 20:02 IST