Heart Attack: मागील काही काळात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे आकडे वाढत आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे यात बहुतांश तरुणांचा समावेश आहे. महिला व पुरुष अशा दोघांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ओढावल्याचे आपण पाहिले आहे. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाहात अचानक अडथळा निर्माण झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो.जेव्हा हृदयाला आवश्यक असलेले रक्त आणि ऑक्सिजन मिळू शकत नाही, तेव्हा ते हृदय योग्यरीत्या पंप होऊ शकत नाही. पुरेशा रक्त आणि ऑक्सिजनशिवाय हृदयाच्या स्नायूंना नुकसान होते व परिणामी मृत्यू ओढवतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हृदयविकाराच्या वयात घट

यापूर्वीच्या अहवालानुसार पुरुषांमध्ये पहिला हृदयविकाराचा झटका येण्याचे सरासरी वय हे ६५ इतके होते तर महिलांमध्ये ७२ वर्ष असे होते. मात्र अलीकडे, हे सरासरी वय कमी होत चालले आहे. गेल्या दशकात, तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढण्यामागे धूम्रपान आणि मादक पदार्थांचे सेवन कारणीभूत असल्याचे मानले जाते.

मात्र हे केवळ दोन घटक हृदयविकाराचे कारण नाहीत. लठ्ठपणा, मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास यासारख्या इतर जोखीम घटकांचा सुद्धा हृदयावर परिणाम होत असतो.

हे ही वाचा<< मांजर पाळल्यास हार्ट अटॅक येणार नाही? ९५०० वर्षे जुना आहे माणूस आणि मांजर यांच्यातील ‘हा’ संबंध, जाणून घ्या

तरुण आणि वृद्धांना येणाऱ्या हार्टअटॅकमध्ये काय फरक आहे?

सर्वात मोठा फरक म्हणेज छातीत दुखणे. हृदयविकाराच्या झटका येण्याचे मुख्य लक्षण मानले जाणारी छातीदुखी तरुण व वृद्धांमध्ये कमी अधिक तीव्रतेने दिसून येते. बहुतांश तरुणांना हार्टअटॅक आधी छातीत अगदी सौम्य कळा जाणवतात तर वृद्धांमध्ये सुरुवातीपासून तीव्र कळा जाणवू लागतात. याशिवाय दोघांमध्ये धाप लागणे, थकवा, दोन्ही खांदे, हात आणि जबडा दुखणे, घाम येणे, चक्कर आल्याचा भास होणे आणि उलट्या होणे याप्रकारची लक्षणे सुद्धा दिसून येतात.

हे ही वाचा<< हृदयाने साथ सोडली, १० मिनिट शून्य हालचाल आणि तेवढ्यात ‘तो’ आला.. IKEA मधील थक्क करणारा अनुभव

स्त्री व पुरुषांना येणाऱ्या हार्टअटॅकमध्ये काय फरक आहे?

मणिपाल हॉस्पिटल हेब्बल, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीचे सल्लागार डॉ. कुमार केंचप्पा यांनी इंडिया टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, महिला रूग्णांमध्ये त्यांच्या समवयीन पुरुषांच्या तुलनेत अगदी कमी लक्षणे असतात. स्त्रियांमध्ये, लक्षणे अधिक हळूहळू दिसून येतात. असामान्य किंवा अत्यंत थकवा हा बहुतेकदा स्त्रियांसाठी पहिल्या लक्षणांपैकी एक असतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याच्या कित्येक दिवस आधी ते सुरू होऊ शकते.

हे ही वाचा<< हार्ट अटॅकपासून करायचा आहे स्वतःचा बचाव? ‘ही’ औषधाची गोळी नेहमी जवळ ठेवा

हार्टअटॅक टाळण्यासाठी काय करावे?

  1. धूम्रपान टाळा
  2. सेकंड हँड स्मोकिंग टाळा म्हणजेच धूम्रपान करणाऱ्यांच्या जवळ थांबू नका.
  3. कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी व्यायाम सुरु करा
  4. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ताणतणावापासून दूर राहा
  5. मधुमेह व्यवस्थापित करा आणि साखर नियंत्रणात ठेवा
  6. नियमित व्यायाम करा
  7. तणाव टाळा / तणावाचे व्यवस्थापन करा
  8. मध्यम वजन राखा.
  9. दरवर्षी एक पूर्ण शरीराची आरोग्य तपासणी करा
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First heart attack symptoms seen in men and women explained what is higher risk age for heart fail svs
First published on: 20-12-2022 at 18:31 IST