लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दूरदर्शनच्या नव्या लोगोबाबतचा वाद आणखी गडद होत चालला आहे. दूरदर्शनच्या लोगोचे लाल रंगावरून केशरी रंगात पुनरागमन झाल्याने वादाला तोंड फुटले आहे. त्यावरून जोरदार राजकीय कलगीतुरा रंगला आहे. विरोधकांनी हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाल्यास माहिती आणि प्रसारण मंत्रालय (MIB) आणि प्रसार भारतीमध्ये आणखी अनेक महत्त्वपूर्ण बदलांची आखणी केली जात असल्याचे वृत्त समोर येत आहे. गेल्या आठवड्यात दूरदर्शनच्या लोगोच्या रंगात लाल ते भगवा असा बदल झाल्याने विरोधी पक्षांकडून टीका झाली. विरोधकांनी सार्वजनिक प्रसारकांवर सत्ताधारी भाजपाशी संबंधित रंगाचा अंगीकार केल्याचा आरोप आहे. विशेषत: हा बदल निवडणूक प्रक्रियेच्या मध्यभागी करण्यात आल्यानं चर्चेचा विषय ठरला आहे. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला नॅशनल ब्रॉडकास्टर सर्व रंगात गेला होता, तेव्हासुद्धा लोगोमध्ये फिकट हिरवा अन् भगवा रंगाचं मिश्रण होते. डीडीच्या कृष्णधवल लोगोच्या दिवसांपासून ते आजच्या भगव्यापर्यंतच्या बदलाची ही कहाणी आहे.

हेही वाचाः समुद्र वाढता वाढता वाढे; आपल्या आयुष्यावर काय परिणाम?

डीडीचे सुरुवातीचे दिवस

१५ सप्टेंबर १९५९ रोजी एक छोटा ट्रान्समीटर आणि तात्पुरता स्टुडिओ वापरून डीडीचे प्रायोगिक प्रसारण सुरू झाले होते. ऑल इंडिया रेडिओचा भाग म्हणून १९६५ मध्ये दैनिक प्रसारण सुरू झाले. डीडीची टीव्ही सेवा १९७२ मध्ये मुंबई आणि अमृतसर, १९७५ मध्ये इतर सात राज्यांमध्ये विस्तारित करण्यात आली. ब्लॅक अँड व्हाईटच्या पहिल्या लोगोला ‘डीडी आय’ म्हणत असत. १९८२ च्या दिल्लीतील आशियाई खेळांदरम्यान लोगो फिकट हिरव्या रंगाबरोबरच केशरीचे मिश्रणात वापरण्यात आला होता. सितार सतारवादक पंडित रविशंकर आणि शहनाई वादक उस्ताद अली अहमद हुसेन खान यांनी दूरदर्शनची धून तयार केली होती आणि ती १ एप्रिल १९७६ रोजी प्रथमच प्रसारित झाली होती. धून आणि लोगो या दोन्हींनी प्रेक्षकांमध्ये प्रतिष्ठित दर्जा प्राप्त केला आहे.

हेही वाचाः विश्लेषण : भारतीयांसाठी युरोपियन युनियनची भेट… शेंगन व्हिसाच्या नियमांमध्ये केलेले बदल महत्त्वाचे का?

लोगोचा मूळ रंग कोणता?

मूळ ‘रंग’ लोगोची रचना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (NID) च्या देवाशीष भट्टाचार्य यांनी केली होती. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला पंतप्रधान इंदिरा गांधी (ज्या देखील माहिती आणि प्रसारण मंत्री होत्या) यांनी काही डिझाइन पर्यायांपैकी एक लोगो निवडला होता. भट्टाचार्य हे NID मधील आठ मित्रांसह अहमदाबादमध्ये एका सरकारी प्रकल्पावर काम करीत होते, जेव्हा दूरदर्शनला आकाशवाणीपासून वेगळे करून स्वतंत्र करण्याची कल्पना केली जात होती. पाच वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका मुलाखतीत भट्टाचार्य यांनी सांगितले की, त्यांनी दोन वक्रांची रचना केली आहे. यिन आणि यांगच्या चित्रणाची भिन्नता चिनी तत्त्वज्ञानावर आधारित असून, सुरुवातीला त्यांच्याकडे सादर केलेल्या १४ कलाकृतींपैकी एक होती. मूळ डिझाईन १९८० आणि १९९० च्या दशकात सुरेख होती आणि एनआयडीच्या विद्यार्थ्यांनी या सुधारणेचे नेतृत्व केले. आर एल मिस्त्री यांनी स्थिर लोगो ॲनिमेट करण्याचे काम केले, त्यांनी विविध कोनातून कॉपी काढल्या आणि डीडी आयचे अंतिम स्वरूप तयार केले. लोगोच्या सुरुवातीच्या आवृत्त्यांमधील सत्यम शिवम सुंदरम ही टॅगलाइन नंतर काढून टाकण्यात आली.