भारत सरकारने गेल्या महिन्यात ‘मिशन मौसम’ नावाच्या योजनेची घोषणा केली. याच योजनेंतर्गत भारतात पहिले क्लाऊड चेंबर पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) येथे तयार करण्यात येत आहे. ‘मिशन मौसम’चे उद्दिष्ट केवळ देशातील हवामान अंदाज सुधारणेच नव्हे तर काही हवामान घटनांचे व्यवस्थापन करणे आणि आवश्यकतेनुसार पाऊस, गारपीट, धुके आदींवर नियंत्रण मिळवणेदेखील आहे. भारताला ‘वेदर रेडी’ आणि ‘क्लायमेट स्मार्ट’ करणे, हे या योजनेमागील उद्दिष्ट असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. क्लाऊड चेंबर नक्की काय आहे? क्लाऊड चेंबरचा फायदा काय? भारताला क्लाऊड चेंबर का तयार करायचे आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्लाऊड चेंबर म्हणजे काय?

क्लाऊड चेंबर बंद दंडगोलाकार ट्यूबलर ड्रमसारखे असते; ज्यामध्ये पाण्याची वाफ, एरोसोल इंजेक्ट केले जाते. या चेंबरमध्ये असणार्‍या आर्द्रता आणि तापमानामुळे ढग विकसित होऊ शकतात. पुण्यात सुरू करण्यात येणार्‍या या क्लाऊड चेंबरमुळे शास्त्रज्ञांना ढगांचे थेंब किंवा बर्फाचे कण तयार करणार्‍या बीज कणांचा शाश्वत पद्धतीने अभ्यास करता येईल. बऱ्याच देशांमध्ये मूलभूत क्लाऊड चेंबर्स आहेत, परंतु मिशन मौसम अंतर्गत भारतातील मान्सून ढगांचा अभ्यास करण्यासाठी भारत कन्वेक्टिव्ह गुणधर्म असलेले क्लाऊड चेंबर तयार करत आहे.

हेही वाचा : ‘McDonald’ बर्गर खाल्ल्याने ४९ जणांना ई-कोलायचा संसर्ग; कारण काय? हा जीवाणू किती घातक?

ढगाच्या आत इंट्रा-पार्टिकलचा परस्परसंवाद, पावसाचे थेंब आणि बर्फाचे कण तयार होणे, चक्रीवादळ किंवा कमी दाब प्रणालीमुळे वातावरणात आर्द्रतेचा प्रभाव आदींचा अभ्यास करण्यासाठी भारतात हे चेंबर तयार करण्यात येत आहेत. कन्व्हेक्टिव्ह क्लाऊड चेंबरच्या स्थापनेचा उद्देश सामान्यतः भारतीय हवामान प्रणालींवर परिणाम करणाऱ्या परिस्थितीत क्लाऊड फिजिक्सची अधिक चांगली समज प्राप्त करणे हा आहे. त्यानंतर या महितीचा उपयोग हवामान बदलाच्या धोरणात्मक नियोजनासाठी करता येईल.

ढगाच्या आत इंट्रा-पार्टिकलचा परस्परसंवाद, पावसाचे थेंब आणि बर्फाचे कण तयार होणे, चक्रीवादळ किंवा कमी दाब प्रणालीमुळे वातावरणात आर्द्रतेचा प्रभाव आदींचा अभ्यास करण्यासाठी भारतात हे चेंबर तयार करण्यात येत आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

शास्त्रज्ञ क्लाऊड चेंबर वापरण्याची योजना कशी आखत आहेत?

क्लाऊड चेंबरच्या स्थापनेमुळे शास्त्रज्ञांना भारतीय हवामानावर प्रभाव टाकणाऱ्या पर्यावरणीय आवश्यकतांनुसार भौतिक आणि वायुमंडलीय मापदंड तयार करता येणे शक्य होऊ शकेल. “आमच्याकडे काही नवीन कल्पना आहेत आणि आम्हाला त्याची चाचणी घ्यायची आहे. मान्सूनचे ढग कसे वागतात, याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही योग्य योजना आखत आहोत,” असे वरिष्ठ आयआयटीएम शास्त्रज्ञ आणि ढगांच्या भौतिकशास्त्रातील तज्ज्ञ थारा प्रभाकरन म्हणाले. पुढील १८ ते २४ महिन्यांत भारतीय शास्त्रज्ञांचा गट मुख्यत्वे क्लिष्ट आणि अत्यंत प्रगत उपकरणे आणि तपासण्या विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करेल, जे चेंबर तयार झाल्यावर तैनात केले जातील. चेंबरचे बांधकाम येत्या काही महिन्यांत होणार आहे. प्रभावी हवामान बदलासाठी सर्वात महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे क्लाऊड फिजिक्स; ज्यामध्ये भारताला आपले संशोधन मजबूत करावे लागणार आहे. पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) येथे भारत आपला पहिला क्लाऊड चेंबर स्थापन करत आहे.

हेही वाचा : रशियामध्ये पंतप्रधान मोदींना देण्यात आलेले चक-चक आणि कोरोवाई हे पारंपरिक पदार्थ काय आहेत? त्यांचे महत्त्व काय?

भारतात क्लाऊड सिडिंगचा प्रयोग करण्यात आला आहे का?

क्लाऊड एरोसोल इंटरॅक्शन अँड पर्सिपिटेशन एन्हान्समेंट एक्सपेरिमेंट (CAIPEEX) कार्यक्रम एका दशकाहून अधिक काळ चाललेल्या चार टप्प्यांत आयोजित करण्यात आला होता. शेवटच्या टप्प्यात, २०१६-२०१८ या काळात महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मर्यादित भौगोलिक क्षेत्रावर काही प्रयोग केले गेले. प्रयोगांच्या विश्लेषणाने पुष्टी दिली की, योग्य परिस्थितीत ढग बीजन हे प्रदेशात पर्जन्यमान वाढवण्यासाठी एक प्रभावी धोरण होते. सोलापूर पर्जन्यछायेचा प्रदेश असल्याने याची निवड करण्यात आली. या प्रदेशात १०० चौरस किलोमीटर क्षेत्रात ४६ टक्के (±१३ टक्के आणि सरासरी) पर्जन्यमान वाढवले ​​जाऊ शकते. परंतु, पावसाच्या समस्या सोडविण्यासाठी क्लाऊड सीडिंग कितपत प्रभावी ठरेल, हे सांगता येणे अद्याप शक्य नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India is building a cloud chamber as part of mission mausam rac