ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर सोमवारी (१९ सप्टेंबर) विंडसर कॅसल येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. विंडसर कॅसलमधील सेंट जॉर्ज चॅपल येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्यावरही याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दरम्यान, सेंट जॉर्ज चॅपल परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय या शाही कुटुंबातील आठव्या सदस्य आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> विश्लेषण : न्यूड मुर्त्या आणि फोटो; रणवीर सिंहच्या फोटोशूटच्या निमित्ताने जाणून घेऊया जगभरातील ऐतिहासिक संस्कृती

विंडसर किल्ला राजघराण्यामध्ये का महत्त्वाचा आहे?

विंडसर कॅसल (किल्ला) लंडनच्या पश्चिमेला ४० किमी अंतरावर आहे. हा किल्ला १२ व्या शतकापासून राजघराण्यातील अनेक अधिकृत निवासस्थानांपैकी एक आहे. हा किल्ला थेम्स नदीच्या दक्षिण किनार्‍याजवळ १३ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर उभारण्यात आलेला आहे. या किल्ल्यामध्ये दोन चतुर्भुज इमारती आहेत. ज्यांना ‘कोर्ट’देखील म्हटले जाते. यापैकी पश्चिमेला असलेल्या इमारींना लोवर वॉर्ड म्हणतात. तर पूर्वेकडील इमारतींना अपर वॉर्ड म्हटले जाते. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर लोअर वॉर्ड परिसरात अंत्यसंस्कार केले जातील.

हेही वाचा >>> विश्लेषण : अवघ्या सहा सामन्यांत WTC च्या अंतिम फेरीत जाण्याची भारताला संधी? जाणून घ्या नेमकी कशी असेल आकडेमोड!

अपर वॉर्ड परिसरातील इमारतींमध्ये शाही कुटुंब राहते. या वार्डमध्ये मोठा रिसेप्शन हॉल आहे. तसेच द रॉयल लायब्ररी, वाटरलू चेंबर तसेच अभ्यागतांसाठी अपार्टमेंटही आहे. विंडसर कॅसलच्या आजूबाजूला मोठी उद्याने आहेत. यातील सर्वात मोठे उद्यान ‘ग्रीन पार्क’ म्हणून ओळखले जाते. हे उद्यान जवळपास १८०० हेक्टर परिसरात पसरलेले आहे. या भागात ५ किमी लांबीचा ग्रीन अव्हेन्यू असून त्याला ‘लाँग वॉक’ म्हटले जाते. या परिसरात एक कृत्रिम तलावही आहे, ज्याला ‘व्हर्जिनिया वॉटर’ म्हटले जाते.

हेही वाचा >>> विश्लेषण : चित्त्यांच्या आगमनाची उत्सुकता… आणि काही अनुत्तरित प्रश्नही!

विंडसर कॅसल कोणी बांधला?

विंडसर कॅसल अतिशय भव्य आणि प्रेक्षणीय असला तरी त्याचा अगदीच छोटा भाग पर्यटकांना पाहण्यासाठी खुला आहे. उर्वरित परिसर राजघराणे, त्यांचे पाहुणे आणि कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित आहे. हा किल्ला १०८६ सालापासून ब्रिटीश राजघराण्याशी सबंधित आहे. हा किल्ला सर्वप्रथम विल्यम द कॉन्कररने बांधला. परकीय आक्रमणापासून लंडनचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. त्यानंतर विल्यम द कॉन्कररचे उत्तराधिकारी हेन्री प्रथम यांनी या किल्ल्याचे निवासामध्ये रुपांतर केले. पुढे हेन्री द्वितीय यांनी या किल्ल्याचे राजवाड्यात रुपांतर केले. १५७० मध्ये राणी एलिझाबेथ प्रथम यांनी या विंडसर कॅसलवर एका गॅलरीची निर्मिती केली. ही गॅलरी पुढे २० व्या शतकात शाही ग्रंथालयाशी जोडण्यात आली.

हेही वाचा >>> RIP Asad Rauf: जगप्रसिद्ध पंच ते पाकिस्तानात शूज विक्रेता..भारतीय मॉडेलच्या ‘या’ आरोपाने बदललं असद रौफ यांचं आयुष्य

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर विंडसर कॅसल परिसरातच अंत्यसंस्कार होणार

चार दिवसांच्या अंत्यदर्शन समारंभानंतर राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर विंडसर कॅसल पिरिसरातच अंत्यंस्कार केले जातील. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिंस फिलीप यांच्या शेजारीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. राजघराण्यातील इतर व्यक्तींवरही याच परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यामध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वडील किंग जॉर्ज सहावे (१९५२), आई राणी एलिझाबेथ (२००२) बहीण मार्गारेट यांच्यावर विंडसर कॅसलमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Queen elizabeth second final resting place windsor castle history know all information prd