काही दिवसांपूर्वा काँग्रेसचे ज्येष्ठ नते अधीर रंजन चौधरी यांनी देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख करताना राष्ट्रपतीऐवजी राष्ट्रपत्नी हा शब्द वापरला. चौधरी यांच्या या चुकीमुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. चौफेर टीका झाल्यानंतर अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींना लेखी माफीदेखील मागितली. मात्र हा वाद समोर आल्यानंतर देशाच्या महिला राष्ट्रपतींना नेमके काय संबोधावे अशी चर्चा पुन्हा एकदा होत आहे. याच पार्श्वभूमीवर देशाच्या महिला राष्ट्रपतींच्या नाव कसे आले याबाबत जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> विश्लेषण : २० महिन्यांत ६ वेळा अपघात, MiG-21 लढाऊ विमानांसोबत असं का होतंय, जाणून घ्या सर्वकाही

देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान प्रतिभाताई पाटील यांना मिळाला. त्यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर देशाच्या महिला प्रमुखाला राष्ट्रपती का म्हणावे असे विचारले जाऊ लागले. त्यावेळी राष्ट्रपती महिला असतील तर त्यांना राष्ट्रपती म्हणून नये. राष्ट्रपती हे पितृसत्ताक तसेच लिंगाधारित पक्षपतीपणा करणारे नाव आहे, असे मत महिला कार्यकर्त्यांनी मांडले. त्यानंतर देशाच्या महिला राष्ट्रपतींना राष्ट्रपत्नी म्हणावे असे मत मांडण्यात आले. मात्र हे संबोधन तज्ज्ञांकडून फेटाळण्यात आले.

हेही वाचा >> विश्लेषण : करोना काळात घटलेले मुलांचे लसीकरण किती चिंताजनक?

महिला राष्ट्रपतींना संबोधण्यासाठी कोणता शब्द योग्य?

देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी जुलै १९४७ मध्ये देशाच्या प्रमुखांना काय म्हणावे यावर संविधान सभेत चर्चा करण्यात आली. यावेळी संविधान सभेचे सदस्य केटी शाह यांनी महिला राष्ट्रपतींना नेता म्हटले जावे असे मत मांडले. तसेच काही सदस्यांनी महिला राष्ट्रपतींना कर्णाधार म्हणायला हरकत नाही, असे सांगितले.

हेही वाचा >> विश्लेषण : ‘बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया’ म्हणजेच BGMI वर बंदी का घालण्यात आली?

डिसेंबर १९४८ मध्ये हाच मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील वेगवेगळ्या भाषांमधील संविधानाच्या मसुद्यात राष्ट्रपतींबाबतच्या मसुद्यात कोणत्या संज्ञा वापरण्यात आल्या आहेत, याबाद्दल माहिती दिली. इंग्रजीमध्ये राष्ट्रपतींना प्रेसिंडेट तर हिंदी भाषेतील संविधानात ‘हिंद का एक प्रेसिडेंट’ असे म्हणण्यात आले होते. यामध्ये हिंद म्हणजे भारत देश तर प्रेसिडेंट म्हणजेच देशातील सर्वोच्चपद असा त्याचा अर्थ होता. आंबेडकरांनी हिंदी भाषेतील संविधानात राष्ट्रपतींना प्रधान, तर उर्दू भाषेत सरदार असे म्हणण्यात यावे, असे सूचवले होते.

हेही वाचा >> विश्लेषण : स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेने काय साधणार? आयएनएस विक्रांतचे महत्त्व काय?

संविधान समितीचे सदस्य केटी शाह यांनी देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीला ‘मुख्य कार्यकारी आणि राज्याचे प्रमुख’ असे संबोधित करावे असे सुचवले होते. मात्र सदस्यांनी त्याला कडाडून विरोध केल्याने शाह यांची दुरुस्ती फेटाळण्यात आली होती. दरम्यान, देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीला काय म्हणावे या चर्चेला राष्ट्रपती हा शब्द अंतिम करुन पूर्णविराम दिला गेला. देशाचे पहिला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्व प्रस्ताव फेटाळात शेवटी राष्ट्रपती हे नाव कायम केले. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात काँग्रेसच्या अध्यक्षांनाही राष्ट्रपती म्हटले जायचे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtrapati or rashtrapatni what is right way to call president of india know detail information prd