भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी काम पाहिले. आदिवासी समाजातून आलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती तर देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. स्वतंत्र भारतात जन्मलेल्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी २०१५ ते २०२१ या कालावधीत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्या मूळ ओडिशा राज्यातील असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. ओडिशा सरकारमध्ये त्यांनी लिपिक, कनिष्ठ सहाय्यक आणि शिक्षिका म्हणून काम केल्यानंतर १९९७ साली त्या राजकारणात उतरल्या. ओडिशातील रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून त्या दोनदा भाजपाच्या आमदार झाल्या.
त्यानंतर २००० ते २००४ दरम्यान ओडिशा सरकारमध्ये मंत्रीही होत्या.Read More
मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मंगळवारी काँग्रेसने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन केली
भाजपा-आरएसएसच्या काळात राष्ट्रपतींची प्रतिष्ठा कमी केली जात असल्याचाही आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच सर्व विरोधक मिळून उदघाटन सोहळ्यावर बहिष्कार घालण्याच्या…
PM Modi Birthdayआज पंतप्रधान मोदींचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसह विरोधकही त्यांना शुभेच्छा देत आहेत. राहुल गांधी, अरविंद…
Ram Nath Kovind Farewell: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी निरोप समारंभासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.