Ganesh Chaturthi Special Recipe : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या उत्सवाच्या काळात अनेकांच्या घरी बाप्पाला नैवेद्यासाठी रोज मोदक आणि इतर चमचमीत पदार्थ बनवले जातात. त्याशिवाय काही गृहिणी मोदकाचे वेगवेगळे प्रकारही ट्राय करून पाहतात. यापूर्वी आपल्याला उकडीचे मोदक, तळलेले मोदक किंवा ड्रायफ्रूट्सपासून बनवलेल्या मोदकांचीच रेसिपी ठाऊक होती. पण, आज आपण मोदकाची आमटी कशी बनवतात हे पाहणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदकाची आमटी याला ‘उंबर हंडी’, असेही म्हणतात, हा एक खानदेशातील पारंपरिक पदार्थ आहे; जो बनवण्यासाठी खूप वेळ जातो. पण, चवीला तो एकदम झणझणीत, मसालेदार असा खाद्यपदार्थ आहे. त्यामुळे तो खाणारा खाल्ल्यानंतर त्याचे कौतुकच करील, अशा या मोदकाच्या झणझणीत आमटीची रेसिपी खालीलप्रमाणे :

मोदकाची आमटी बनवण्यासाठी आपल्याला तीन वेगवेगळ्या गोष्टी आधी तयार करून घ्यावा लागतात. एक म्हणजे मोदक बनवण्यासाठी मळलेले कणीक, त्यात भरण्यासाठी लागणारे सारण आणि रस्सा बनवण्यासाठी लागणारे वाटण. ही रेसिपी marathi_food_blogger_pune नावाच्या फेसबुक अकाउंटवर शेअर करण्यात आली आगेय

मोदकाचे सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती

साहित्य : कढईत दोन चमचे तीळ, दोन चमचे कारळे, थोडी खसखस, दीड वाटी भाजून घेतलेले सुके खोबरे टाकून नीट भाजून एका प्लेटमध्ये काढा. त्यानंतर थोडी दालचिनी, काळी मिरी गरम तेलात गरम भाजून, त्यात दीड वाटी कांदा घालून लाल होईपर्यंत भाजा. आता एक प्लेटमध्ये टीस्पून हळद, गोडा मसाला, तिखट मसाला, गरम मसाला, लाल तिखट, धणे-जिरे पूड व चवीनुसार मीठ घ्या आणि सर्व मिश्रण मिक्सरमध्ये एकत्र बारीक वाटून घ्या. त्यात पाणी अजिबात घालू नये.

मोदकाचे कणीक मळण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती

सर्वप्रथम एका प्लेटमध्ये एक वाटी बेसनाचे पीठ आणि त्यात अर्धा वाटी गव्हाचे पीठ घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड आणि तेल घालून मळून घ्या. तेलाचा हात लावून आता हे कणीक झाकून ठेवावे. त्यानंतर रश्शाला फोडणी दिल्यानंतर मळलेल्या पिठाचा छोटा गोळा करून त्याची पारी तयार करा. आता कांदा आणि कोंथिबीरमध्ये बारीक केलेले सारण मिसळून ते भरा आणि त्याला मोदकाचा आकार द्या.

मोदकाच्या आमटीच्या रश्शासाठी लागणारे वाटण बनवण्याचे साहित्य आणि कृती

थोडे खसखस, एक वाटी सुके खोबरे, एक उभा चिरलेला कांदा, लसणाच्या चार ते पाच पाकळ्या, आले लालसर होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर त्यात एक चमचा लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, तीळ आणि चवीनुसार मीठ व कोथिंबीर मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या.

https://www.facebook.com/reel/234664482495629

मोदकाची आमटी बनवण्याची कृती

सर्वप्रथम एका कडईत थोडे तेल गरम करा. त्यात अगदी थोडे हिंग आणि जिरे टाका. त्यानंतर त्यात रस्सा बनवण्यासाठी तयार केलेले वाटण टाकून चार ते पाच मिनिटे तेल सुटेपर्यंत चांगले भाजून घ्या. आता त्यात थोडे गरम पाणी घालून, दोन ते तीन मिनिटे मोठ्या गॅसवर उकळी काढून घ्या आणि तयार केलेले मोदक उकळीमध्ये सोडा.

आता दोन मिनिटे गॅस मध्यम आचेवर ठेवा, आमटी झाकण न ठेवता १० मिनिटे शिजवा. मधे मधे दोन-तीन वेळा ही आमटी अगदी हलक्या हाताने हलवून घ्या म्हणजे आमटी शिजली की नाही ते तुम्हाला समजेल. साधारण १० मिनिटांनी तळाला असलेले मोदक शिजल्यामुळे वर येतील म्हणजे समजून जा की मोदकाची आमटी तयार आहे. आमटीतील मसाल्यांमुळे तिला घट्टपणा येते. त्यामुळे पाणी थोडे जास्त वापरा. ही आमटी बनवण्यासाठी वेळ लागतो; पण चवीला ती एकदम झणझणीत मसालेदार लागते.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi 2023 modakachi aamti recipe in marathi modakachi bhaji umbar curry recipe sjr