Gauri Avahan 2025 Wishes in Marathi : गौरी आवाहन आणि गौरीपूजन हा महिलांसाठी खास असतो. यंदा गौराईचं आगमन म्हणजेच गौरी आवाहन ३१ ऑगस्ट रोजी झालं आहे. आज १ सप्टेंबरला सोमवारी गौरी पूजन होईल आणि रविवारी २ सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचं विसर्जन करण्यात येईल.

महाराष्ट्रात गणेशोस्तवादरम्यान गणपतीबरोबर गौराईचा सण देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रत्येक भागात गौरीचं मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. तसेच प्रत्येक प्रांतात गौरी आवाहन आणि पूजन करण्याची पद्धती वेगवेगळी असते. पण, तुम्ही गौरी आवाहन आणि पूजनाच्या दिवशी तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता आणि या दोन्ही दिवसाचा गोडवा वाढू शकता.

गौरी आवाहन आणि गौरी पूजन शुभ मुहूर्त (Gauri Avahan and Gauri Poojan Shubha Muhurta)

यंदा रविवार, ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटांपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना ज्येष्ठ गौरीचे घरोघरी आगमन झाले. तसेच सोमवारी गौरी पूजनाचा शुभ मुहूर्त पहाटे ५ वाजून ५९ मिनिटांपासून सुरु होईल ते संध्याकाळी ६ वाजून ४३ मिनिटांपर्यंत असणार आहे.

गौरी आवाहन शुभेच्छा संदेश (Gauri Avahan Wishes In Marathi)

सोन्या-मोत्यांच्या पावली माझ्या अंगणी आली गं गौराई,
पंचपक्वान्नं, झिम्मा-फुगडी, पूजा-आरतीची करा हो घाई!
गौरीच्या आवाहनाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी व आरोग्य लाभो हीच प्रार्थना!

ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या दिनी
गौराई तुमच्या घरात सुख, समृद्धी, आनंद
आणि भरभराट घेऊन येऊ दे ही सदिच्छा!
गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!

गौरी माते, नमन करते तुला
अखंड सौभाग्य लाभू दे मला
हेच मागणं मागते तुला
गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!

गौरी पूजन शुभेच्छा संदेश (Gauri Pujan Wishes In Marathi)

आली आली गं गौराई आली माहेराला,
चला गं सयांनो, गौराईच्या पुजनाला!
आरतीचे ताट घ्या ओवाळायला
मानाचा पाट द्या दिला बसायला
चला गं सयानों, गौराईच्या पुजनाला!

आली माझ्या गं अंगणी गौराई,
लाभो तुम्हास सुख समृद्धी,
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पहाटे पहाटे मला जाग आली
चिमण्यांची किलबिल माझ्या कानावर पडली
हळूच एक चिमणी कानात सांगू गेली
ऊठाऊठा सकाळ झाली
जेष्ठ गोरी याच्या आगमनाची वेळ झाली
जेष्ठ गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गवर गौरी ग गौरी ग,
झिम्मा फुगडी खेळू दे,
हिरव्या रानात रानात
गवर माझी नाचू दे
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लेकी-सुनांची माय माऊली
देईल मायेची सावली,
आली गौराई माहेराला,
भाजी-भाकर द्या गं तिला जेवायला
करा तिची मनोभावे सेवा
ती देईल तुम्हा सुख-समृद्धीचा ठेवा
जेष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!