कोल्हापुरात कर्जमुक्तीचे साखर, पेढे वाटून आनंद
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी घेतला असतानाही त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना एक दिवसानंतर आज सवड मिळाली. निर्णय जाहीर होताच काल सर्वपक्षीय शेतकरी संप समन्वय समितीच्या वतीने शिवाजी चौक येथे साखर पेढे वाटून आनंद साजरा केला होता. याच जागी उशिरा जाग आलेल्या भाजपने आनंदोत्स्व साजरा केला.
मुंबई येथे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील व आंदोलक शेतकरी सुकाणू समितीच्या दरम्यान झालेल्या बठकीत निकषांवर आधारित सरसकट कर्जमाफी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने घोषित केली.
यानिमित कोल्हापूर भाजप महानगरच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथे सोमवारी सायंकाळी साखर पेढे वाटून व आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस सुभाष रामुगडे, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, नगरसेवक विजय खाडे-पाटील, दिलीप मेत्रानी, सुरेश जरग, संपतराव पवार, कुलदीप देसाई, विजय अग्रवाल आदींसह पदाधिकारी, कार्यकत्रे उपस्थित होते.
