जिल्ह्य़ातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : राज्यात उभय काँग्रेसची आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू असताना सोमवारी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी विधानसभेच्या सर्व दहा जागा लढवण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज जिल्हा काँग्रेस भवनात पार पडल्या. स्वागत शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी केले.

राष्ट्रवादीबरोबर युतीचा निर्णय करण्यापूर्वी जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करावी. प्रदेश समितीने एकतर्फी निर्णय घेऊ  नये.  ताकदीने निवडणूक लढवायची असेल तर जिल्ह्यातील नेत्यांना वरिष्ठांनी विश्वासात घ्यावे,अशी मागणी आवाडे यांनी केली.

निरीक्षक आनंदराव पाटील यांनी ईव्हीएम मशीन मधील घोटाळयामुळेच भाजपचा लोकसभा निवडणुकीत मोठा विजय झाला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका मतपत्रिकेवर झाल्या पाहिजेत,अशी मागणी केली.

अभय छाजेड यांनी विधानसभा निवडणुकीत सरकारच्या  जलयुक्त शिवारातील योजनेतील भ्रष्टाचारापासून अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे जनतेसमोर ठामपणे मांडता येतील,असे सांगितले.

अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव सोनल पटेल यांनी ६ किंवा ७ तारखेला पक्षाची मुंबईत बैठक होईल, त्यापूर्वी मुलाखती घेत आहोत, असे सांगितले.

कोल्हापुरात पाटलांचा सतेज ऋतू

कोल्हापूर उत्तर व दक्षिण या शहरातील दोन मतदारसंघात काका- पुतणे अशा दोघांनी उमेदवारी मिळावी अशी मागणी केली. विधान परिषद सदस्य सतेज पाटील यांनी दक्षिणमध्ये लढणार असल्याचे सांगितले. तर, त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर उत्तर या मतदारसंघाची राष्ट्रवादी मागणी करत असलातरी, मुळात  हा मतदार संघ काँग्रेसचा आहे,असे सांगत उमेदवारीचा दावा केला.उत्तरसाठी आठ इच्छुकांनी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ready to contest all the assembly seats in kolhapur zws