कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचा शुक्रवारी ५१ वा वर्धापन दिन पार पडला. इतक्या वर्षांच्या कालावधीत महापालिकेच्या मुख्य वास्तूवर ‘कोल्हापूर महापालिका’ असा फलक नव्हता. ही बाब महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यांच्या ध्यानात आली. आणि त्याने स्वतःहून पदरचे वीस हजार रुपये खर्च करीत असा फलक तयार केला. तो आज वर्धापन दिनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या भिंतीवर लावला. यामुळे या वास्तूला कोल्हापूर महापालिकेची ओळख असणारे रुपडे मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेच्या केशवराव भोसले नाट्यगृहातील कर्मचारी प्रकाश गजानन शिंगे यांनी इमारतीच्या प्रवेशद्वारावर ‘कोल्हापूर महापालिका’ नावाची स्टीलचे अक्षरे असलेला फलक बनवला. तो वर्धापन दिनी लावला जावा अशी इच्छा व्यक्त केली. या फलकाचे अनावरण आज प्रशासक के. मंजू लक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या हस्ते प्रकाश शिंगे यांचा शाल, पुस्तक व रोप देऊन सत्कार करण्यात आला. यानंतरही प्रश्न उपस्थित झाला कि एका चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्याला सुचणारी कल्पकता महापालिकेत वर्षनुवर्षे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ध्यान्यात का येऊ नये. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, उप-आयुक्त शिल्पा दरेकर, साधना पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा : कोल्हापूर : बिद्री कारखान्याचा राज्यात सर्वाधिक ऊस दर; प्रतिटन ३ हजार ४०७ रुपये देण्याची के.पी. पाटील यांची घोषणा

दाताच उपेक्षित

कोल्हापूर महापालिका नावाचा फलक देणारा दाता फलकाच्या अनावरण कार्यक्रमात उपेक्षित राहिला. फलक अनावरण झाल्यावर छायाचित्र घेण्यात आले. त्यामध्ये अधिकारी सर्वात पुढे आणि फलक देणारे प्रकाश शिंगे हे मात्र मागच्या रांगेत एकटेच उभे राहिले. किमान अशावेळी त्यांचा सन्मान करावा हि अपेक्षा फोल ठरली.

ध्वजारोहण

महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्तकर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महापालिकेच्यावतीने चांगल्या दर्जाची सेवा सुविधा सर्व नागरकांना पोहचविण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून करूया, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग फायनान्स कार्पोरेशनवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वर्चस्व; नागपूर अपवाद वगळता निवडणूक बिनविरोध

स्मशानभुमीस शेणी अर्पण

वर्धापन दिनानिमित्त महापालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने ५१ हजार शेणी पंचगंगा स्मशानभुमीकडे सुपूर्द करण्यात आल्या. महापालिका कर्मचाऱ्याकडून गेली १० वर्षे पंचगंगा स्मशानभुमीस शेणी प्रदान करण्याचा उपक्रम राबवला जात आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur after 51 years name board of kolhapur municipal corporation displayed on municipal corporation building css