कोल्हापूर : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या ऊस गळीत हंगामासाठी प्रतिटन ३४०७ रुपये दर देणार आहे, अशी घोषणा कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी शुक्रवारी केली. बिद्री साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया गेली महिनाभर सुरू होती. तर याच काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस दराचे आंदोलन पेटले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मागील हंगामासाठी प्रति टन ४०० रुपये आणि या हंगामासाठी एफआरपी पेक्षा अधिक रक्कम देण्याची मागणी केली होती. त्यासाठी बराच वेळ बराच काळ आंदोलन सुरू होते.

या संघटनेने बिद्री कारखान्याकडेही दराची जादा दराची मागणी केली होती. मात्र कारखान्याचे निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने याबाबतचा निर्णय झाला नव्हता. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत के. पी. पाटील यांच्या महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने निर्विवाद विजय मिळवला. सर्व २५ जागांवर विजय मिळवून सत्ता कायम राखली. यानंतर कारखान्याच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीकडे लक्ष लागले होते. आज सहकार निबंध ए.पी. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक पार पडली. यावेळी के. पी. पाटील यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपद सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निमित्ताने नवनिर्वाचे संचालक आज प्रथमच कारखान्यात आले होते.

हेही वाचा : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग फायनान्स कार्पोरेशनवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वर्चस्व; नागपूर अपवाद वगळता निवडणूक बिनविरोध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिद्री साखर कारखाना गेली काही वर्ष राज्यात सर्वाधिक दर देत आहे . सर्वाधिक दर देणारा कारखाना अशी या कारखान्याची ओळख झाली आहे. ही ओळख कायम ठेवण्यात के .पी.पाटील यशस्वी ठरले आहे. त्यांनी आज उसाला प्रति टन ३४०७ रुपये तर देण्याची घोषणा करून बिद्री कारखाना हा ‘लय भारी’ कारखाना असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. ‘बिद्री’ साखर कारखान्याने मागील हंगामात १२.६२ टक्के साखर उताऱ्याला प्रतिटन ३२०९ रुपये दर दिला होता. ८ लाख ८० हजार टनाचे गाळप केले होते. के पी पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना शब्द दिल्याप्रमाणे उच्चांकी दर दिला आहे. बिद्रीच्या निवडणुकीत जाहीरनाम्यात दिल्याप्रमाणे सभासदांना अपेक्षेपेक्षा जादा दर देण्याचा शब्द कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी दिला होता. तो खरा ठरल्याची चर्चा तीन तालुक्यांत आहे.