कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या इचलकरंजी या दोन्ही महापालिकेची बहुप्रतिक्षित प्रभाग रचना बुधवारी जाहीर झाली. मागील निवडणुकीपेक्षा सुमारे दीडपट प्रभाग विस्तारला असून, त्यात लक्षणीय बदल झाले आहेत. यामुळे इच्छुकांच्या निवडणूक लढवण्याच्या एकूणच आव्हाने वाढली असल्याच्या प्रतिक्रिया आहेत.

कोल्हापूर महापालिकेत गेली सात वर्षे प्रशासकराज आहेत. तर इचलकरंजी महापालिका स्थापन झाल्यापासून गेली तीन वर्षे हीच स्थिती आहे. महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. परंतु, या ना त्या कारणाने निवडणुका लांबत गेल्याने इच्छुकांचाही हिरमोड झाला होता.

काल प्रभाग रचना महापालिका निवडणूक जाहीर होणार असल्याचे जाहीर केले होते. याकडे नगरवासीयांसह इच्छुकांचे लक्ष वेधले होते. आज दुपारी कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली. ती पाहण्यासाठी इच्छुकांची गर्दी उसळली होती. तर प्रथमच महापालिका निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या इचलकरंजी महापालिकेच्या यंत्रणेतील विस्कळीतपणा दिसून आला. रात्री उशिरा ही प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. सध्या ज्या प्रभागात निवडणूक लढवली गेली. त्याच्यापेक्षा सुमारे दीडपट प्रभागाचे भौगोलिक क्षेत्र विस्तारले आहे. शिवाय त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली असून, चार प्रभाग असलेल्या वार्डात निवडणूक लढवणे अधिक आव्हानात्मक बनल्याची प्रतिक्रिया इच्छुकांनी व्यक्त केली.

कोल्हापूर महापालिकेत गेली सात वर्षे प्रशासकराज आहेत. तर इचलकरंजी महापालिका स्थापन झाल्यापासून गेली तीन वर्षे हीच स्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या इचलकरंजी या दोन्ही महापालिकेची बहुप्रतिक्षित प्रभाग रचना बुधवारी जाहीर झाली. महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. परंतु, या ना त्या कारणाने निवडणुका लांबत गेल्याने इच्छुकांचाही हिरमोड झाला होता. महायुतीकडून या प्रभाग रचनेबद्दल समाधान व्यक्त केले जात असताना विरोधकांनी प्राथमिक टप्प्यात यामध्ये जाणीवपूर्वक फोडल्याचा आरोप होत असून, अभ्यासांती मत व्यक्त करणार असल्याचे सांगण्यात आले.

कोल्हापुरात २० प्रभाग

कोल्हापूर महापालिकेने प्रभाग रचना जाहीर केली आहे. एकूण २० प्रभागातून ८१ सदस्य निवडले जातील. एक ते १९ प्रभाग हे चार सदस्यीय आहेत. तर २० नंबरचा प्रभाग हा पाच सदस्यीय आहे. सरासरी २५ ते ३० हजार मतदारांचा एक प्रभाग आहे. या प्रभाग रचनेवर १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत हरकती मागविल्या आहेत.