कोल्हापूर : गादीचा सन्मान राखा अन्यथा २०१९ सालचा तो फोटो व्हायरल करु, असा इशारा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांना उद्देशून दिला. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकी वेळी संजय मंडलिक हे शिवसेनेकडून उभे होते. त्यावेळी त्यांनी श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते. त्याचे फोटो किंवा काढले गेले होते. ते आता व्हायरल होण्याचे इशारा देण्यात आला आहे. खासदार संजय मंडलिक यावेळच्या निवडणुकीत श्रीमंत शाहू महाराज यांच्यावर गादीचा वारसदार , मान  गादीला मत मोदीला अशा शब्दातून टीका करायला सुरुवात केली आहे. यावरून त्यांना आज सभेत प्रस्तुतर देण्यात आले.

महागांव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलं होते.  या सभेला महिला मतदारांची लक्षणीय उपस्थिती होती. या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी छत्रपती शाहू महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन काम करणार्‍या काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना दिल्लीत पाठवण्याची संधी या निवडणूकीमुळं मतदारांना मिळाली असल्याने गडहिंग्लज तालुक्यातून सर्वाधिक मतदान द्यावे,असे आवाहन केलं.

हेही वाचा >>>शक्तिपीठ मार्ग शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा; संभाजीराजे यांचा आरोप

यावेळी आमदार सतेज पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांच्या विकासकामांवर समोरा समोर येऊन चर्चा करण्याचे आव्हान स्विकारले. गादीचा सन्मान राखा अन्यथा २०१९ चा फोटो व्हायरल करु असा इशारा सतेज पाटील यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांकडून आम्ही अन्याय विरोधात लढणं शिकलो आहे. त्याच शिकवणी नुसार सध्या लोकशाही वाचवण्यासाठी लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितले.

माजी जिल्हा परिषद सदस्य  विनायक उर्फ अप्पी  पाटील यांनी देशातील दडपशाही थांबवण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना मोठ्या मताधिक्क्यानं दिल्लीत पाठवण्याचं आवाहन केले.गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी सर्वसामान्य जनतेनं ज्यांना मोठ्या विश्‍वासानं खासदार म्हणून पाठवलं ते खोके घेऊन ओके झालेत अशी टीका संजय मंडलिक यांना उद्देशून केली.भाजप हा पक्ष फोडणारा पक्ष आहे. दुकानदार जसे एकदा विकलेला माल परत घेत नाहीत त्याच पध्दतीनं शिवसैनिक आणि सामान्य मतदार सुद्धा एकदा विकलेला खासदार पुन्हा जवळ घेणार नाहीत, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी खासदार मंडलिकांवर निशाणा साधला.

यावेळी गोपाळराव पाटील, किसन कुराडे,रामराजे कुपेकर, नंदाताई बाभुळकर, विद्याधर गुरबे,नितीन पाटील, सोमनाथ आरबोळेे,अमर चव्हाण ,शिवाजीराव खोत, संजय चव्हाण ,अभिषेक शिंपी ,विक्रम चव्हाण- पाटील, गिरीजादेवी शिंदे – नेसरीकर ,संजय तोरडकर ,विलास पाटील, प्रशांत शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.