कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी ती बदलली जाण्याची शक्यता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी व्यक्त केली आहे. यामुळे शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारांची घोषणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानंतरही महायुती अंतर्गत वादातून उमेदवार बदलाची मागणी होत आहे. अशातच संजय शिरसाठ यांनी एखादा उमेदवार कमजोर वाटत असेल तर मुख्यमंत्री शिंदे असा उमेदवार कधीही बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा उल्लेख करून त्यांचा निर्देश खासदार माने यांच्या दिशेने राहिला.

हेही वाचा : “परिवर्तनाची सुरुवात कोल्हापुरातून करूया”, शाहू छत्रपती यांची साद

मीच उमेदवार – माने

याचे खंडन धैर्यशील माने यांनी मंगळवारी केले आहे. ते म्हणाले, काल केलेले विधान एप्रिल फुल समजून कार्यकर्त्यांनी विसरावे. उमेदवार बदलायचा असता तर जाहीर करण्यापूर्वीच तो बदलला असता. आता कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे संभ्रम करण्याची गरज नाही. माझे सर्व अहवाल सकारात्मक असल्याने उमेदवारी देण्यात आली आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will cm eknath shinde replace hatkanangale lok sabha candidate dhairyasheel mane shivsena dispute sanjay shirsath css