राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा

कोल्हापूर, पुणे आणि नाशिक संघांनी मनमाड येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत वर्चस्व राखले. कोल्हापूरने १२ तर पुण्याने आठ सुवर्णाची लयलूट केली. यजमान नाशिक जिल्ह्याने तीन सुवर्णपदके मिळवली.
मनमाड येथील नेहरू भवनात झालेल्या या स्पर्धेत मुले व मुलींच्या गटात एकूण १४ संघांनी सहभाग घेतला. १७ वर्षांखालील गटात गोपी शिंदे, राजू अस्वले, केशव माने, गिरीश भोर (सर्व पुणे), रणजित चव्हाण, घनश्याम देसाई (कोल्हापूर), सुजित पाटील (क्रीडा प्रबोधिनी), अक्षय उदेकर (अमरावती) यांनी सुवर्णपदक मिळविले. या गटात मुलींमध्ये इम्मतवार आशाराणी, मोहिनी चव्हाण, रूपा हनगंडे, श्रध्दा पवार, ऐश्वर्या कदम (सर्व कोल्हापूर), पूनम सुतार (पुणे), किरण जीनवाणी (क्रीडा प्रबोधिनी) यांनी सुवर्ण मिळविले.
१९ वर्षांखालील गटात गणेश काकडे, चंद्रकांत सुतार, नीलेश पवार (सर्व कोल्हापूर), अक्षय गायकवाड, दिलीप आडके (क्रीडा प्रबोधिनी), सॉलोमन पी. (मुंबई), महादेव जाधव (पुणे) यांनी तर, मुलींमध्ये कल्याणी खैरनार, श्रध्दा माळवतकर (नाशिक), दिपाली गुरसाळे, रूपाली माळी (कोल्हापूर), जुई जांभूळकर, पूजा नायर (पुणे), दिपाली देवकर (अमरावती) यांनी सुवर्णापर्यंत मजल मारली. नाशिकच्या श्रध्दा
माळवतकर व कल्याणी खैरनार यांची सांगली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.