जगातील सर्वात मोठा फुटबॉलचा विश्वचषक अर्थात फिफा वर्ल्डकप यंदा कतारमध्ये खेळवला जात आहे.  बहुतांश देशात खेळला जाणारा खेळ म्हणजे फुटबॉल क्रिकेटच्या तुलनेतही अधिक प्रसिद्ध आहे. याच लोकप्रिय फुटबॉलच्या विश्वचषकाला काही तास शिल्लक राहिले असून यंदा हा विश्वचषक आखाती देशांपैकी एक कतार येथे पार पडत आहे. दरम्यान कतारमध्ये होणार्‍या यंदाच्या फिफा विश्वचषकाला फार कमी दिवस शिल्लक राहिले आहेत. २० नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता कतार आणि इक्वेडोर यांच्यातील सामन्याने या भव्य स्पर्धेची सुरुवात होईल. या स्पर्धेत जगभरातील फुटबॉल खेळणारे ३२ सर्वोत्तम संघ सहभागी होत असून, २० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे.

तर या भव्य स्पर्धेतील सामन्यांचं थेट प्रक्षेपण, ग्रुप स्टेजचे सामने अशी महत्त्वाची माहिती जाणून घेऊ…

फिफा विश्वचषकाचे ग्रुप

ग्रुप A : कतार, इक्वेडोर, सेनेगल, नेदरलँड

ग्रुप B : इंग्लंड, इराण, अमेरिका, वेल्स

ग्रुप C : अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड

ग्रुप D : फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, ट्युनिशिया

ग्रुप E: स्पेन, कोस्टा रिका, जर्मनी, जपान

ग्रुप F: बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया

ग्रुप G : ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरून

ग्रुप H: पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, कोरिया प्रजासत्ताक

हेही वाचा :   IND vs NZ: “षटकार मारणे हे ताकदीवर नाही…”, शुभमन गिलने सांगितला फलंदाजीचा मंत्र

फिफा विश्वचषक २०२२ चे स्वरूप

ग्रुप स्टेजमधील साखळी सामन्यात, प्रत्येक संघ त्यांच्या गटातील इतर तीन संघांविरुद्ध एक सामना खेळेल. प्रत्येक गटातील सर्वोतम २ संघ राऊंड ऑफ १६च्या फेरीत प्रवेश करतील. जिथून बाद फेरीचे सामने सुरू होतील. म्हणजेच विजयी संघ पुढे जातील आणि पराभूत संघ विश्वचषकातून बाहेर पडतील. राऊंड ऑफ १६ मध्ये आठ सामने होतील, ज्यामध्ये १६ पैकी ८ संघ सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. उपांत्यपूर्व फेरीत चार सामने होणार असून विजयी चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. सेमीफायनलनंतर अंतिम सामना १८ डिसेंबरला खेळवला जाईल.

फिफा विश्वचषकाचे वेळापत्रक

फिफा विश्वचषकाचे साखळी सामन्यांना हे २० नोव्हेंबर म्हणजेच येत्या रविवारपासून सुरु होणार आहेत. त्याआधी संध्याकाळी ७.३० वाजता विश्वचषक उद्घाटन सोहळा कतार मधील दोहा येथे विविध मान्यवरांच्या उपस्थित रंगणार आहे. साधारणतः २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ३ डिसेंबर पासून बाद फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल. पहिल्या दिवशी एकच सामना खेळला जाणार असून नंतर मात्र दररोज दिवसाला दोन ते चार सामने खेळले जातील. कधी दोन, तीन किंवा चार असे सामने दिवसाला खेळवले जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३०, ६.३०, ९.३० आणि १२.३० वाजता सामने पहावयास मिळणार आहेत.

हेही वाचा :  IND vs NZ: भारत-न्यूझीलंड सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने दोन्ही संघांचे खेळाडू रमले वेगळ्याच खेळात, पाहा video 

सामना कुठे, कधी आणि किती वाजता पाहायला मिळणार

फिफा विश्वचषकाचे सर्व सामने हे कतार मधील नव्याने बांधण्यात आलेल्या आठ स्टेडीयममध्ये होणार आहेत. संपूर्ण विश्वचषकात एकूण ६४ सामने खेळले जाणार असून उपांत्य फेरीत पोहचणारे संघांना सात-सात सामने खेळावे लागणर आहेत. Viacom-१८ कडे भारतातील फिफा विश्वचषक २०२२ चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-१८ आणि स्पोर्ट्स-१८ एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच वूट Select आणि जिओ टीव्ही वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.