भारताचा सलामीवीर शुभमन गिल याचे न्यूझीलंडशी खास नाते आहे. याच देशात, २०१८ मध्ये भारताच्या अंडर १९ विश्वचषक स्पर्धेत त्याने केलेल्या अप्रतिम कामगिरी केली होती. प्रथमतःच त्याने या माध्यमातून मोठ्या स्तरावर प्रभाव पाडला होता. त्यानंतर एका वर्षातच, शुभमन गिलने न्यूझीलंडच्या हॅमिल्टनमध्ये भारतासाठी एकदिवसीय पदार्पण केले आणि भविष्यातील प्रसिद्ध खेळाडूपैकी एक तो बनला आहे. गिल हा भारताच्या कसोटी संघात नियमित असला तरी, त्याला अजून बरेच टी२० सामने खेळायचे आहेत तसेच तो एकदिवसीय संघाच्या बाहेर आहे.

पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेसाठी न्यूझीलंडमध्ये पहिल्या पसंतीच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत, शुभमन गिलला टी२० पदार्पणाची संधी मिळू शकते. एकदिवसीय मालिकेत, त्याने या वर्षी वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नऊ पैकी सात सामन्यांमध्ये शिखर धवनसह सलामीवीर म्हणून फलंदाजीची सुरुवात केली होती.

Akash Chopra Says Hardik Pandya’s yet but his absence is definitely hurting GT this season
IPL 2024 : “त्याच्या उपस्थितीचा मुंबईला फायदा झाला नसेल, पण…”, हार्दिक पंड्याबाबत माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
Who is Angkrish Raghuvanshi
IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई
Mayank Yadav Reveals About Fitness
IPL 2024 : सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवच्या फिटनेसचं रहस्य काय? त्यानंच सांगितलं तो काय करतो?

शुबमन गिल प्राइम व्हिडिओ प्रसारणात बोलताना म्हणतो की,”मी येथे अंडर-१९ विश्वचषकासाठी आलो होतो. तसेच मी येथे २०१९ साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. न्यूझीलंडमध्ये परत आल्याने छान वाटत आहे. निश्‍चितच, न्यूझीलंडला परत येण्याने माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. मला जेव्हा कळले माझी न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड झाली आहे तेव्हा मला या गोष्टीचा फार आनंद झाला. मी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील सराव करत असलेल्या काही गोष्टी मी येथे नक्कीच पूर्ण करू शकतो.”

हेही वाचा :   IND vs NZ: भारत-न्यूझीलंड सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने दोन्ही संघांचे खेळाडू रमले वेगळ्याच खेळात, पाहा video

टी२० क्रिकेटमध्ये खेळताना षटकार मारण्याविषयी शुभमन गिल म्हणतो की, “मला नेहमीच असे वाटते की उत्तुंग षटकार मारणे हे ताकद दाखवणे नसून, योग्य वेळ साधण्यावर अवलंबून आहे. जर मला ते योग्य प्रकारे साधता आले, तरच मी तो षटकार मारू शकतो. आणि हे केवळ मलाच कळू शकते. मी नेहमीच चौकार किंवा षटकार मारण्यापेक्षा धावगती वाढवण्याचा विचार करतो. मला कमीत कमी निर्धाव चेंडू खेळायचे आहेत हे मी कायम लक्षात ठेवतो. धावफलक हलता ठेवण्यासाठी १/२/३ धावा काढत रहाणे कायम गरजेचे असते आणि त्यासाठी योग्य पद्धतीने शॉट्स खेळण्याकडे मी अधिक लक्ष देतो. चेंडू स्विंग होत असताना त्याला जोरात फटका मारण्यापेक्षा त्या चेंडूसाठी सावध पवित्रा घेऊन लक्ष देऊन खेळणे गरजेचे आहे.”

हेही वाचा :   IND vs NZ 1st T20: भारत-न्यूझीलंड पहिला टी२० सामना पाण्यात! पावसामुळे नाणेफेकही न होता सामना रद्द

दुर्दैवाने, सततच्या पावसामुळे वेलिंग्टनमधील पहिला टी२० सामना रद्द करण्यात आला. भारत २० आणि २२ नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध आणखी दोन टी२० सामने खेळेल आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे.