Rohit Sharma and Ajit Agarkar Video Viral : विशाखापट्टणममध्ये इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव करून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आता दोन्ही संघांनी तिसऱ्या कसोटीच्या तयारीला सुरुवात केली आहे. राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या सामन्यापूर्वी दोन्ही संघांना १० दिवसांचा ब्रेक मिळाला आहे. १५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीच्या तयारीसाठी इंग्लंड अबू धाबीला रवाना झाला आहे. मात्र दुसऱ्या कसोटीच्या शेवटी रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर सीमारेषेवर चर्चा करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावर चाहते प्रतिक्रिया देत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने इंग्लंडला पराभूत केल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर सीमारेषेजवळ दीर्घ संभाषण करताना दिसले. भारतीय कर्णधार आणि बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष यांच्यात बरीच चर्चा झाली. बहुधा ही चर्चा उर्वरित तीन कसोटी सामन्यासाठीच्या संघ निवडी बाबत असावी. कारण काही खेळाडूंच्या दुखापतीमुळे आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांनी विश्रांती घेतल्याने भारतीय संघ काहीसा कमकुवत झाला होता. विशाखापट्टणममध्ये रवींद्र जडेजा, केएल राहुल आणि कोहली नसतानाही भारताने चार दिवसांत विजय मिळवला.

मात्र, इंग्लंडने भारताला प्रत्येक पावलावर आव्हान दिले. त्यामुळे टीम इंडियाचा पुढचा मार्ग सोपा असणार नाही. बॅझबॉलपासून प्रेरित झालेल्या इंग्लंडने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारताला कडवी झुंज दिली. त्यामुळे संघ व्यवस्थापन, रोहित, आगरकर आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना याची पूर्ण जाणीव असेल. या आठवड्यात जाहीर होणाऱ्या पुढील तीन कसोटी सामन्यांसाठी संघाची तयारी करण्यात भारत वेळ वाया घालवत नाही, असे सामन्यानंतरच्या चर्चेतून सूचित होते. जडेजाची दुखापत किती गंभीर आहे? कोहली परतणार का? जर होय, तर कोण बाहेर जाईल? केएस भरत १५ मधील आपले स्थान टिकवून ठेवू शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील.

हेही वाचा – Rohit Sharma : ‘…म्हणून रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवले’, मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

रोहित आणि आगरकर यांच्यातील संवादाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन म्हणाला की, कोहलीला या योजनेत परत आणण्याचा मार्ग शोधण्यावर चर्चा झाली. कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. ज्यावरून एबी डिव्हिलियर्सने उघड केले की तो दुसऱ्यांदा पिता होणार आहे. मात्र हैदराबाद आणि विशाखापट्टणम या दोन्ही सामन्यांमध्ये त्याची अनुपस्थिती जाणवत असल्याचे पीटरसनने सांगितले.

हेही वाचा – AUS vs WI : अवघ्या ४१ चेंडूत मॅच खिशात, तिसऱ्या वनडेसह ऑस्ट्रेलियाचं निर्भेळ यश

केविन पीटरसन म्हणाला, विराट कोहलीच्या पुनरागमनासाठी ते खूप मेहनत घेत आहेत. कारण तो या मालिकेत दिसत नाही. राहुल द्रविडसुद्धा सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये श्रेयस अय्यरसोबत गंभीर चर्चा करताना दिसला. हे सर्व बदलाचे लक्षण आहे का? वेळच सांगेल. त्याचवेळी भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानही असेच मानतो. अशीही चर्चा आहे की भारत जसप्रीत बुमराहला पुढील कसोटीतून विश्रांती देऊ शकतो जेणेकरून मोहम्मद सिराज परत येईल. विशाखापट्टणममध्ये बुमराहने नऊ विकेट घेतल्या आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A video of rohit sharma and ajit agarkar discussing on the boundary at the end has gone viral in ind vs eng vbm
First published on: 06-02-2024 at 14:59 IST