Mark Boucher on Rohit Sharma and MI Captaincy : आयपीएलच्या आगामी हंगामात मुंबई इंडियन्स संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. रोहित शर्माच्या जागी त्याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आली आहे. रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर बराच वाद झाला होता. आता बऱ्याच काळानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी या प्रकरणावर उघडपणे बोलले आहे. त्यांनी सांगितले की हा निर्णय पूर्णपणे चांगल्या क्रिकेटसाठी होता, कारण संघ बदलाच्या टप्प्यात आहे. पाच वेळचा चॅम्पियन फलंदाज रोहितकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्यासाठी उत्सुक असल्याचे बाउचरने सांगितले.

गुजरात टायटन्सचे दोन वर्षे कर्णधारपद भूषवल्यानंतर हार्दिक नोव्हेंबर २०२३ मध्ये मुंबई इंडियन्समध्ये परतला. आयपीएल २०२४ मिनी लिलावाच्या अवघ्या चार दिवस आधी मुंबई इंडियन्स नवा कर्णधार म्हणून त्याचे नाव जाहीर आले. या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. घोषणेच्या तासाभरात फ्रँचायझीने जवळपास चार लाख फॉलोअर्स गमावले. रोहितच्या दशकभराच्या कर्णधारपदाच्या युगाचा अंत झाल्यामुळे चाहत्यांचा मोठा वर्ग निराश झाला होता.

mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान

मार्क बाउचर काय म्हणाले?

मार्क बाउचर स्मॅश स्पोर्टसच्या मुलाखतीत म्हणाले, “मला वाटते की हा निर्णय पूर्णपणे क्रिकेटशी संबंधित होता. हार्दिकला खेळाडू म्हणून परत येण्यासाठी आम्ही विंडो पीरियड पाहिला. माझ्यासाठी हा बदलाचा एक टप्पा आहे. भारतातील अनेक लोक हे समजू शकत नाहीत. लोक खूप भावनिक होतात. माझ्या मते हा फक्त क्रिकेटशी संबंधित निर्णय घेतला गेला. मला वाटते की यामुळे एक व्यक्ती आणि खेळाडू म्हणून रोहितमधील सर्वोत्तम कामगिरी समोर येईल.”

हेही वाचा – IND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल! नेमकं कारण काय?

मार्क बाउचर यांच्याकडून रोहितच्या नेतृत्त्वाचे कौतुक –

रोहितचे कौतुक करताना बाउचर म्हणाले, “रोहितसोबत मला एक गोष्ट समजली ती म्हणजे तो एक अद्भुत व्यक्ती आहे. म्हणजे तो बऱ्याच काळापासून कर्णधार आहे आणि त्याने मुंबई इंडियन्ससाठी खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. आता तो भारताचेही नेतृत्व करतो. गोष्ट अशी आहे की तो खूप व्यस्त आहे आणि गेल्या काही मोसमात त्याने बॅटने सर्वोत्तम कामगिरी केली नसेल, पण एक कर्णधार म्हणून त्याने चांगली कामगिरी केली आहे.”

हेही वाचा – AUS vs WI : अवघ्या ४१ चेंडूत मॅच खिशात, तिसऱ्या वनडेसह ऑस्ट्रेलियाचं निर्भेळ यश

रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी पाच वेळा विजेतेपद पटकावले –

रोहितने २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने १० वर्षांच्या कार्यकाळात त्याने संघाला पाच आयपीएल विजेतेपद मिळवून दिले. बाउचर यांनी ३५ वर्षीय खेळाडूचे नेतृत्व कौशल्याचे कौतुक केले, परंतु हे देखील कबूल केले की मागील काही आयपीएल हंगामात रोहितने धावा केल्या नाहीत. कर्णधारपदाचे ओझे दूर केल्यास अधिक मोकळेपणाने खेळण्यास मदत होईल, असा त्यांचा विश्वास आहे. रोहितने गेल्या काही आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्ससाठी सातत्यपूर्ण धावा करण्यासाठी संघर्ष केला आहे. त्याने २०२३ मध्ये १६ सामन्यांमध्ये ३३२ धावा केल्या, तर २०२२ मध्ये त्याने १४ सामन्यांमध्ये २६८ धावा केल्या होत्या.