Australia beat West Indies by 8 wickets : कॅनबेरा येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात, ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा आठ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली. तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ २४.१ षटकांत ८६ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने ६.५ षटकांत ८७/२ धावा केल्या आणि सामना जिंकला.
ऑस्ट्रेलियात पूर्ण झालेला हा सर्वात लहान एकदिवसीय सामना होता. ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात पदार्पण करणाऱ्या झेवियर बार्टलेटसाठी ही मालिका खास ठरली. त्याने दोन सामन्यांमध्ये ८ विकेट्स घेतल्याबद्दल सामनावीर आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याची निवड करण्यात आली.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवातीपासूनच वेस्ट इंडिजला धक्के देण्यास सुरुवात केली. डावाच्या तिसऱ्या षटकात सलामीवीर केजॉर्न ओटली ८ धावा काढून झेवियर बार्टलेटचा बळी ठरला. यानंतर कार्टीने १० धावा आणि कर्णधार शाई होपनेही ४ धावा केल्या. १३व्या षटकात कॅरेबियन संघाला चौथा धक्का बसला आणि टेडी बिशप खाते न उघडता ४४ धावांवर बाद झाला. ॲलेक अथानाझेने काही काळ टिकण्याचा प्रयत्न केला पण मोठी खेळी खेळू शकला नाही. तो ६० चेंडूत ३२ धावा केल्यानंतर २० व्या षटकात ७१ धावांवर बाद झाला.

Rohit Sharma broke Virat Kohli's record
Rohit Sharma : रोहित शर्माने मोडला विराट कोहलीचा विक्रम, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केला ‘हा’ खास पराक्रम
Marcus Stoinis Highest individual scores in IPL run chases with 124 Runs
IPL 2024: मार्कस स्टॉइनसची ऐतिहासिक खेळी, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज
Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Mathc Highlights in marathi
KKR vs LSG : कोलकाताचा ऐतिहासिक विजय! लखनऊचा ८ विकेट्सनी उडवला धुव्वा
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Updates in Marathi
DC vs KKR : केकेआरने रचला इतिहास! सुनील नरेनच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीसमोर ठेवले २७३ धावांचे लक्ष्य

विकेट्सची पडझड सुरूच राहिली आणि उर्वरित फलंदाजांमध्ये फक्त रोस्टन चेस (१२) दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकला. उर्वरित फलंदाज स्वस्तात बाद झाले आणि त्यामुळे डाव २४.१ षटकांत आटोपला. अशाप्रकारे वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेतील आपली दुसरी सर्वात कमी निच्चांकी धावसंख्या नोंदवली. ऑस्ट्रेलियाकडून झेवियर बार्टलेटने चार, लान्स मॉरिस आणि ॲडम झाम्पाने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची स्फोटक सुरुवात झाली. जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि जोश इंग्लिश या जोडीने चौथ्याच षटकात ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ५० च्या पुढे नेली.

हेही वाचा – IND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल! नेमकं कारण काय?

ऑस्ट्रेलियाचा चेंडूच्या बाबतीत सर्वात मोठा विजय –

मॅकगर्कने अधिक आक्रमक वृत्ती दाखवत झटपट धावा काढण्याच्या प्रयत्नात १८ चेंडूत ४१ धावा केल्या आणि पाचव्या षटकात तो अल्झारी जोसेफचा बळी ठरला. यानंतर फलंदाजीला आलेला ॲरॉन हार्डी काही विशेष करू शकला नाही आणि २ धावा केल्यानंतर तो ८० धावांवर ओशान थॉमसच्या चेंडूवर बाद झाला. कर्णधार स्टीव्ह स्मिथने ३ चेंडूत नाबाद ६ धावा करत सामना संपवला. इंग्लिशन १६ चेंडूत ३५ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने २५९ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला, जो चेंडूंच्या बाबतीतही त्यांचा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी त्यांनी २००४ मध्ये अमेरिकेविरुद्धचा सामना २५३ चेंडू शिल्लक असताना जिंकला होता.