Virat Kohli guiding the Sri Lankan players during the practice session: आशिया कप २०२३ स्पर्धेतील सुपर-4 फेरीचे सामने सुरु झाले आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश प्रत्येकी एकदा आमनेसामने येणार आहेत. पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवणारे संघ अंतिम फेरीत पोहोचतील. सुपर-4 च्या आव्हानासाठी चारही संघ चांगलाच घाम गाळत आहेत. दरम्यान, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली श्रीलंकेच्या युवा खेळाडूंचा प्रशिक्षक झाला. बीसीसीआयने कोहली आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमधील या खास क्षणाचा व्हिडीओही शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीलंकेच्या खेळाडूंनी विराट कोहलीची घेतली भेट –

आशिया कपमध्ये भारताच्या सराव सत्रादरम्यान श्रीलंकेच्या खेळाडूंनी विराट कोहलीची भेट घेतली. बीसीसीआयने हा व्हिडिओ शेअर केला आहे. घामाने भिजलेला विराट कोहली सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंजवळ गेला आणि बराच वेळ संभाषण केले. कोहलीला भेटलेल्या एका खेळाडूने त्याला विचारले की कोहलीची पातळी गाठण्यासाठी काय करावे लागेल.

कोहलीने स्पष्ट केले की, “क्रिकेट कसे खेळायचे हे सर्वांनाच माहीत आहे, पण काही खेळाडू खूप मोठे का होतात आणि काही का होत नाहीत. खेळाडूंमधील फरक हा मोठ्या गोष्टींमध्ये नसून छोट्या गोष्टींमध्ये असतो. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे काय करता, ते तुम्ही कुठे पोहोचाव हे ठरवते. खूप कमी फरक असतो, पण हा फरक तुम्हाला बाकीच्यांपासून वेगळे बनवतो.”

हेही वाचा – शुबमन गिलच्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरने दिल्या जबरदस्त शुभेच्छा, नेटकरी म्हणाले, “साराच्या खऱ्या अकाऊंटवरून…”

कोहलीने शिकवला मानसिक ताकदीचा धडा –

विराट कोहलीनेही येथे मानसिक ताकदीबद्दल सांगितले. त्याने सांगितले की, “तुम्ही मानसिक ताकदीने मैदानावर १० पैकी ८ लढाया जिंकू शकता.” कोहलीला भेटून खेळाडूंना खूप आनंद झाला. त्यापैकी एक म्हणाला, “त्याने मला सांगितले की व्यावसायिक असणे महत्त्वाचे आहे, स्वत:वर आत्मविश्वास असणे महत्त्वाचे आहे. परिणाम यावर अवलंबून असतात.”

हेही वाचा – Asia Cup 2023: IND vs PAK सामन्यापूर्वी शोएब अख्तरने नसीम शाहाला पाठवला खास संदेश, म्हणाला, “त्याला अधिक विकेट…”

श्रीलंकेसमोर बांगलादेशचे आव्हान असेल –

शनिवारी यजमान श्रीलंकेशी सामना होत असताना बांगलादेश आशिया चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोरमध्ये आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. लाहोरमध्ये झालेल्या सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला पाकिस्तानविरुद्ध सात गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. आता हा सामना त्यांच्यासाठी करो या मरोचा असा असणार आहे. सुपर फोरमध्ये विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात करू इच्छिणाऱ्या श्रीलंकेचे कडवे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A video of virat kohli guiding the sri lankan players during the practice session has gone viral vbm