Rinku Singh revealed the gurumantra given by MS Dhoni: आयपीएल २०२३ मध्ये केकेआरसाठी धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या रिंकू सिंगला अखेर टीम इंडियाच्या संघात स्थान मिळाले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियामध्ये स्थान मिळाल्यानंतर रिंकू सिंगने कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या एमएस धोनीकडून मिळालेला गुरुमंत्र सांगितला आहे. धोनीने आयपीएलदरम्यान जे सांगितले त्याबद्दल रिंकू सिंगने खुलासा केला.

धोनीने रिंकू सिंगला दिला होता हा सल्ला –

रेव्ह स्पोर्ट्सवर बोलताना युवा खेळाडू रिंकू सिंग म्हणाला की, “माही भाईसोबतचे संभाषण खूप छान होते. तेही मी ज्या पोझिशनमध्ये फलंदाजी करतो त्याच पोझिशनमध्ये फलंदाजी करतात. मी त्यांना विचारले की माझा खेळ कसा सुधारु? त्यावर त्यांचे उत्तर अगदी सोपे होते की, तू खूप चांगली फलंदाजी करतोस आणि तू जे करतोस तेच करत रहा.”

रिंकू सिंगची आयपीएल २०२३ मधील कामगिरी –

हा तो रिंकू सिंग आहे, ज्याने आयपीएल २०२३ मध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीने चर्चे आला होता. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने सलग ५ षटकार ठोकले होते. तेव्हापासून तो जागतिक क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. तेव्हापासून टीम इंडियात त्याचा समावेश करण्याची मागणी जोर धरत होती. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टी-२० संघात त्याची निवड न झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर रिंकू सिंगची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडियात निवड झाली आहे.

रिंकू सिंगला केकेआरने ५५ लाखांना विकत घेतले होते, पण त्याच्या संघातील कोट्यावधी रुपये घेतलेल्या खेळाडूंपेक्षा त्याची कामगिरी खूपच चांगली होती. रिंकू सिंगने या मोसमात केकेआरसाठी १४ लीग सामने खेळले आहे. त्यामध्ये ४ अर्धशतकांच्या मदतीने ४७४ धावा केल्या आहेत. तो संघासाठी सर्वोत्तम फिनिशर म्हणून उदयास आला आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडियाचा क्रिकेट संघ –

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक).

राखीव खेळाडू: यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन